

पुणे, पुढारी ऑनलाईन : सांगवी (Pimpri Crime) येथे सोमवारी सकाळी एका योगा प्रशिक्षक विवाहितेनं पहिल्यांदा डाव्या हाताची नस कापली आणि नंतर घरात ओढणीच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्येचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही.
विशाखा दीपक सोनकांबळे (वय-३७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. सविस्तर वृत्त असे की, विशाखा तिचे पती दीपक, १० वर्षांचा मुलगा आणि ६ वर्षांची मुलगी, यांच्यासोबत भाडेतत्वावरील फ्लॅटमध्ये राहत होत्या.
रविवारी रात्री दीपक हे आपल्या मुलासहीत हाॅलमध्ये झापलेले होते. त्यानंतर बेडरुमध्ये विशाखा यांनी डाव्या हाताची शीर कापून घेतील आणि पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेतली. सकाळी उठल्यानंतर दीपक यांना विशाखा यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.
दीपक यांनी त्वरीत पोलिसांनी (Pimpri Crime) माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सांगवीतील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात हलविले. पण, विशाखा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डाॅक्टरांनी घोषीत केले. घटनास्थळी पोलिसांना रक्ताचे डाग असलेली डायरी दिसून आली. पोलिसांनी ती डायरी ताब्यात घेतली. पण, आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.
पहा व्हिडीओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय?