पिंपरी : शस्त्र परवाना मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक | पुढारी

पिंपरी : शस्त्र परवाना मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा गृहमंत्रालयातून शस्त्र परवाना मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिक तरुणाची आठ लाख 63 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार जानेवारी 2019 ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत काळेवाडी येथे घडला.
प्रसाद ऊर्फ दिगंबर तुकाराम फुगे (27, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राज ऊर्फ धनराज बाळू गायकवाड (30, रा. लोहगाव, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फुगे यांनी शस्त्र परवान्यासाठी गृह विभाग, मुंबई मंत्रालय अर्ज केला होता. दरम्यान, आरोपी राज याने फुगे यांना फोन केला. मी गृहविभागातील काम पाहतो. मला तुमची फाईल तिथे मिळाली. त्यावरून मी तुमचा मोबाईल नंबर घेतला आणि तुमच्याशी संपर्क केला. मी शहरात अनेक जणांचे शस्त्र परवाने मंजूर करून दिले आहेत. तुमचा शस्त्र परवाना मंजूर करण्यासाठी माझ्याकडे काम द्या, तुम्हाला पाच ते सहा महिन्यांत काम करून देतो, असे राज याने फुगे यांना आमिष दाखवले. त्यासाठी फुगे यांच्याकडून राजने वेळोवेळी आठ लाख 63 हजार रुपये घेतले. त्यानंतर फुगे यांचा शस्त्र परवाना मंजूर करून न देता त्यांची फसवणूक केली. वाकड पोलिस तपास करीत

Back to top button