

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे शहराला सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या सरकारचा विचार आहे. त्यासोबतच राज्यातही डबल इंजिनचे सरकार आहे आणि आम्हीही पुण्याच्या जवळचे आहोत, त्यामुळे पुणे शहराचा नागर विमान क्षेत्रात व इतर विकास सुध्दा जोरात होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागर हवाई मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले.
पुण्यातील 'एरोमॉल पार्कींग'च्या उद्घाटन कार्यक्रमासाठी सिंधिया पुण्यात आले होते. उद्घाटन कार्यक्रमानंतर ज्योतिरादित्य सिंधीया यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पुणे शहराचा आगामी काळात मोठ्या प्रमाणावर विकास होणार असल्याचे संकेत दिले.
यावेळी खासदार अॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या, ज्योतिरादित्य सिंधिया पुणे विमानतळाचा विकास करण्यावर भर देत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी पुरंदर विमानतळ देखील लवकरात लवकर व्हावे, यासाठी देखील काम करावे.
अधिक वाचा :