Rishab Shetty And Rashmika Mandanna : ‘कांतारा’चा सुपरस्टार ऋषभ शेट्टीला करायचे नाही रश्मिका मंधाना सोबत काम | पुढारी

Rishab Shetty And Rashmika Mandanna : ‘कांतारा’चा सुपरस्टार ऋषभ शेट्टीला करायचे नाही रश्मिका मंधाना सोबत काम

पुढारी ऑनलाईन डेस्क : कन्नड चित्रपट ‘कांतारा’ अद्यापही चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालतोय. सध्या हा चित्रपट ओटीटीवर स्ट्रीमिंग होत आहे. या चित्रपटामुळे सिनेसृष्टीला साऊथचाच पण आणखी एक पॅन इंडिया स्टार मिळालीची भावना आहे. तर या चित्रपटामुळे याचा नायक व दिग्दर्शक असणारा ऋषभ शेट्टीची सर्वत्र चर्चा आणि कौतुक सुरुच आहे. पण, सध्या तो आणखी एका कारणामुळे नव्याने चर्चेत येत आहे. याचे कारण त्याचा एक जुना व्हिडिओ ज्यामध्ये त्याने मुलाखत दिली होती. तो पुन्हा नव्याने व्हायरल होत आहे. तर या व्हिडिओत त्याने सध्याची आघाडी पॅन इंडिया अभिनेत्री जी साऊथचीच आहे, तिच्या सोबत या पठ्ठ्याने चक्क काम करण्यासच नकार दिलाय. त्यामुळे ऋषभ शेट्टी त्याच्या या जुन्या वक्तव्यामुळे पुन्हा नव्याने चर्चेत आला आहे आणि ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून सर्वाच्या दिलाची धकडन सर्वांची श्रीवल्ली अभिनेत्री रश्मिका मंधाना आहे. (Rishab Shetty And Rashmika Mandanna)

अभिनेत्री रश्मिका मंधाना सोबत काम करण्यास अभिनेता ऋषभ शेट्टी उत्सुक नसल्याचे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण, हे सत्य आहे त्याच्या जुन्या मुलाखतीत त्याने रश्मिका पेक्षा इतर अभिनेत्री खूप प्रभावी आणि चांगल काम करत आहेत व त्यांच्या सोबत काम करायला आवडेल असे विधान ऋषभने केले आहे. सध्या साऊथ आणि बॉलिवूड दोन्हीकडे रश्मिकाची चलती आहे. ही अभिनेत्री सर्वांनाचा आपल्या चित्रपटासाठी हवी आहे. पण, नव्याने नावारुपाला आलेल्या ऋषभ शेट्टी या अभिनेत्याने तिच्या बाबत फारसे सकारात्मक प्रतिक्रीया दिलेली नाही. (Rishab Shetty And Rashmika Mandanna)

ऋषभला आवडतात या अभिनेत्री (Rishab Shetty And Rashmika Mandanna)

तर सध्या जो व्हिडिओ व्हायरल होतो आहे. त्यामध्ये ऋषभला असे विचारण्यात आले की, साई पल्लवी, संमथा, किर्ती सुरेश आणि रश्मिका मंधाना या पैकी कोणत्या अभिनेत्री सोबत काम करण्यास आवडेल असे विचारण्यात आले. त्यावेळी ऋषभ म्हणाला, मला साई पल्लवी आणि समांथाचे काम खूप आवडते. सध्या या दोघी खूप चांगले काम करित आहेत. यांच्या सोबत काम करण्यास आवडेल असे सांगत, नाव न घेता त्याने इतर अभिनेत्री आवडत नसल्याचेच एकप्रकारे सांगून टाकले.

नव्या लोकांसोबत काम करण्यास जास्त आवडते

या व्हिडिओमध्ये ऋषभ शेट्टी पुढे असे म्हणतो की, मी आधी माझी स्क्रीप्ट पूर्ण करतो आणि त्यानंतर ठरवतो की मला कोणत्या कलाकारांसोबत काम करायचे आहे. मला नव्या लोकांसोबत काम करायला अधिक आवडते कारण ते नवे असतात, त्यांच्याकडे वेळ असतो व आपल्याला हवे तसे काम त्यांच्याकडून करुन घेता येते. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या जास्त अपेक्षा नसतात. (Rishab Shetty And Rashmika Mandanna)

रश्मिकाला ऋषभ शेट्टीनेच केले होते लॉन्च

हो, आज जरी ऋषभ म्हणत असला की मला रश्मिका सोबत काम करण्यास आवडणार नाही. तर त्यामध्ये पूर्ण तथ्य नाही. कारण ‘किरक पार्टी’ या कन्नड चित्रपटात रश्मिकाला ऋषभ शेट्टीनेच ब्रेक दिला. या चित्रपटाद्वारे त्याने तिला या इंडस्ट्रीत स्टार बनवलं. या चित्रपटात रक्षित शेट्टी हा अभिनेता होता आणि याचे दिग्दर्शन ऋषभ शेट्टी याने केले होते.

दोघे एकमेकांना का टाळतात

गेले अनेक दिवस कन्नड चित्रपटसृष्टीत रश्मिका मंधाना आणि ऋषभ शेट्टी यांच्यात बेबनाव असल्याचे बोलले जात आहे. ते दोघी एकमेकांना टाळत आहेत, शिवाय ते एकमेकांविषयी सुद्धा बोलण्याचे टाळताना दिसतात. यामुळे या व्हायरल व्हिडिओमध्ये सुद्धा ऋषभने सर्व काही रश्मिका विषयीच बोलला आहे. पण, त्याने जाणून बुजून नाव घेण्याचे टाळले आहे.

रश्मिकाला अभिनेत्री व्हायचे नव्हते

तर आणखी एक व्हिडिओ व्हायल होत आहे, ज्यामध्ये रश्मिकाची मुलाखत आहे. या मुलाखतीत रश्मिका म्हणते की, मला अभिनेत्री व्हायचे नव्हते. मला या क्षेत्रात सुद्धा यायचे नव्हते. उलट माझे फोटो पाहून प्रोडक्शन हाऊस मधून मला फोन आला आणि चित्रपटात काम करण्याविषयी विचारणा केली गेली. पहिल्यांदा जेव्हा मला फोन आला तेव्हा मला असे वाटले की, कोणी तरी आपली खेचतय, आपल्या सोबत प्रँक करण्याचा प्रयत्न होताय. मी अनाहुत पणे या क्षेत्रात आले आहे, असे रश्मिकाचे मत आहे.

अधिक वाचा :

Back to top button