काजीपेठ-मुंबई रेल्वेच्या मागणीलाही महाप्रबंधकांचा लाल कंदील | पुढारी

काजीपेठ-मुंबई रेल्वेच्या मागणीलाही महाप्रबंधकांचा लाल कंदील

हिंगोली, पुढारी वृत्‍तसेवा : काजीपेठ येथुन मुंबई (दादर) रेल्वेला अकोला- हिंगोली – पूर्णा मार्गे करण्याची मागणी दक्षिण-मध्य रेल्वे विभागाने फेटाळली होती. काजीपेठ येथुन मुंबई (दादर) रेल्वेला अकोला- हिंगोली – पूर्णा मार्गे करण्याची मागणी दक्षिण -मध्य रेल्वे विभागाने फेटाळली होती. ऑगस्ट महिन्यात दक्षिण मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे मागणी केली.

रेल्‍वे क्र. ०७१९७ क्रमांकाची ही विशेष रेल्वे दर शनिवारी तेलंगाणामधील काजीपेठ, चंद्रपूर, वणी, अदिलाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा मार्गे मुंबईच्या दादर अशी धावणार आहे. विशेष रेल्वे काजीपेठ येथून वर्धा, अकोला, हिंगोली, वाशिम व पूर्णा मार्गाने पुढे मुंबईकडे जावी अशी मागणी करण्यात आली होती.

दरम्‍यान, या मार्गाने ही गाडी धावल्‍यास याचे अंतर वाढणार असून प्रवाशांना असुविधा होईल, असा खुलासा दक्षिण-मध्य रेल्वेचे महाप्रबंधकांनी केला आहे. याच पत्रात महाप्रबंधकांनी जालना – मुंबई चालणारी जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोली स्थानकापर्यंतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला असल्याचेही सांगितले आहे. दर दिवशी जालना- मुंबई चालणारी जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोलीपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव खुद्द महाप्रबंधकांनी रेल्वे बोर्डाकडे पाठविला असेल तर निदान त्याला तरी मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी या भागातील प्रवाशांकडून होत आहे.

… तर सचखंड अकोला मार्गे का नको? 

तेलंगणा राज्यातील काजीपेठ येथून आठवड्यात धावणारी रेल्वे हिंगोली मार्गाने धावणारी नकार घंटा वाजवितांना महाप्रबंधक खुलासा देत आहेत की या मार्गामुळे अंतर वाढेल. मग नांदेड येथुन पंजाब राज्यातील अमृतसरला जाणारी रेल्वे मनमाड मार्गे कशी चालु आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

पूर्णा येथून थेट अकोला मार्गे खंडवा अशी चालविल्यास सचखंड एक्सप्रेसचेही अंतर कमी होऊ शकते, ही गाडी नांदेडहुन निघुन औरंगाबाद, मनमाड, भुसावळ असा लांब १३७ किमीचा फेरा घेऊन खंडवा स्थानकापर्यंत येत असते. आठवडी रेल्वेला जर मार्ग वळविण्यासाठी जादा अंतराचा अडसर असेल तर दररोज चालणार्‍या सचखंड एक्सप्रेसला जादा अंतराने का सोडले जात आहे? असा सवालही प्रवाशांकडून केला जात आहे.

हेही वाचा 

षड्यंत्राने भारतीय वीरांचा इतिहास दडपला, अजेंडा बदलण्याची गरज : पंतप्रधान मोदी

खळबळजनक! शेतामध्ये वीज वाहक तारा टाकून महिलेला मारण्याचा प्रयत्न, महाराष्ट्रातील पहिलीच घटना

जालना : लहान बहिणीपाठोपाठ मोठ्या बहिणीनेही सोडला प्राण 

Back to top button