Cyber Crime : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास अटक

Cyber Crime : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला खासदार, महिला पत्रकार यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. गणेश नारायण गोटे असे या आरोपीचे नाव आहे. (Cyber Crime) याप्रकरणी दि १४ ऑक्टोबर रोजी एक फिर्याद देण्यात आली होती.

एक व्यक्ती अश्लील भाषेचा वापर करुन अपमानास्पद, लज्जास्पद आणि आपत्तीजनक अशा पोस्ट Twitter अकाऊंटवरून करत होती.  संविधानिकपदावर असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला खासदार, महिला पत्रकार यांच्याविरोधात हा मजकूर तो प्रसारित करीत होता. याबाबत महाराष्ट्र सायबर विभागामध्ये याची फिर्याद देण्यात आली. आरोपीने पोलिसांना याबाबतचा कोणताही सुगावा लागू नये यासाठी Public Wifi, Hotspot, VPN चा वापर करत हा मजकूर प्रसारित केला होता. (Cyber Crime)

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर  येथे दि. २८ ऑक्टोबर रोजी धाड टाकली. यामध्ये दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन दि २९ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे रवानगी केली. याबाबत अधिक तपासानंतर गणेश नारायण गोटे (वय २९) यास अटक करण्यात आली आहे. तपासात दोन मोबाईल फोन, एक लॅपटॉप जप्त करण्यात आला. तांत्रिक बाबींचा तपास करुन संशियताने प्रसारित केलेला मजकूर आणखी कोणाकडून तयार करुन घेतला आहे का, याबाबत पोलीस तपास सुरु आहे.

न्यायालयाने या आरोपीस बुधवारपर्यंत (दि २) पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत  तपास मधुकर पांडे, अप्पर पोलीस महासंचालक, यशस्वी यादव, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय शिंत्रे, पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक, महाराष्ट्र सायबर विभाग करीत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news