Sidhu Moose Wala :… तर आम्‍ही भारत सोडणार : सिद्धू मूसेवालाच्‍या वडिलांचा इशारा | पुढारी

Sidhu Moose Wala :... तर आम्‍ही भारत सोडणार : सिद्धू मूसेवालाच्‍या वडिलांचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आम्‍ही २५ नोव्‍हेंबरपर्यंत वाट पाहू, या कालावधीमध्‍ये आम्‍हाला न्‍याय मिळाला नाही तर आम्‍ही देश सोडून जावू, असा इशारा  पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांचे वडील वडील बलकौर सिंह यांनी सरकारला दिला आहे. सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी न्याय मिळत नसल्याने देश सोडून जाण्‍याबरोबर याप्रकरणी दाखल केलेला गुन्‍हाही मागे घेणार असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे. (Sidhu Moose Wala )

पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांची२९ मे २०२२ रोजी हत्‍या झाली होती. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्‍हावी, अशी मागणी बलकौर सिंह यांनी केली होती. काही दिवसांपूर्वी सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी आरोप केला होता की, माझ्या मुलाच्या मृत्यूसाठी आम्हाला कोणत्याही सरकार आणि पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा नाही. पंजाब पोलिसांनी गुंडांना रिमांडवर घेणे ही फक्त नाटक सुरु आहे, असा आरोप केला होता.

बलकौर सिंह यांनी आपल्या ताज्या वक्तव्यात म्हटले आहे की, “२५ नोव्हेंबर आपण वाट पाहणार आहोत. सिद्धूच्‍या मारेकर्‍यांना गजाआड करण्‍यात पोलिसांना अपयश आल्‍यास आपल्या कुटुंबासह भारत सोडणार आहेत. याशिवाय मुलाच्या हत्येचा एफआयआरही मी मागे घेणार आहे.”

पोलीस आम्हाला न्याय देऊ शकले नाहीत. सिद्धूचा आयफोन तपासला गेला होता. मात्र संशयित आरोपी लॉरेन्स बिश्नोई टोळी आजून कार्यरत आहे. याप्रकरणी पोलिसांनी ठोस कारवाई केलेली नाही, असेही त्‍यांनी म्‍हटलं आहे.   (Sidhu Moose Wala)

हेही वाचा

Back to top button