Pune Cyber Crime News : ‘क्रिप्टो’तील गुंतवणुकीच्या आमिषाने 30 लाखांना गंडा

Pune Cyber Crime News : ‘क्रिप्टो’तील गुंतवणुकीच्या आमिषाने 30 लाखांना गंडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून पुण्यातील एकाला सायबर चोरट्यांनी तब्बल 30 लाख 87 हजारांचा आर्थिक गंडा घातला आहे. याप्रकरणी, लोणीकाळभोर येथील 37 वर्षीय व्यक्तीने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 21 जुलैपासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एरिन आणि रिकी नावाच्या व्यक्तींनी व्हॅाट्सॲपवर मेसेज पाठवला. क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर नफा मिळेल, असे सांगून फिर्यादींना यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड केले. त्यावेळी दोघांनी फिर्यादींना आपण टेलीग्रामध्ये चांगल्या पदावर काम करत असल्याची बतावणी केली. गुंतवणूक केल्यास प्रचंड पैसे मिळतील, असे भासवून फिर्यादी यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यानंतर बनावट वेबसाईटच्या आधारे खोटा नफा मिळत असल्याचे भासवून त्यांना एकूण 30 लाख 87 हजार रुपये भरण्यास प्रवृत्त केले.

प्रत्यक्षात ते पैसे खात्यातून काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यामध्ये अडचणी येत होत्या, त्यामुळे फिर्यादी यांनी विचारणा केली असता पैसे काढण्यासाठी आणखी पैसे भरावे लागतील, असा तगादा लावण्यात आला. आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात एरिन आणि रिकी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल पाटील या करत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news