पुणे : उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी इंदापूरातील शिक्षकाने चक्क सोडली नोकरी! | पुढारी

पुणे : उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी इंदापूरातील शिक्षकाने चक्क सोडली नोकरी!

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेला खिंडार पडले आहे. मात्र अनेक जण शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलासाही मिळत आहे. त्यातच पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील एका शाळेच्या शिक्षकाने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.

एकनाथ शिंदेंच्या गुप्त दिल्लीवारीची चर्चा; मध्यरात्री अमित शहांसोबत खलबते

दीपक पोपट खरात असे राजीनामा देणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत “शिवसेना” या पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे खरात यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. दि. २७ जुलै रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. खरातांच्या राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले आहे.

संबंधित बातम्या

Sharad Pawar : दोघांनाच सरकार चालविण्याचा आत्मविश्वास म्हणून मंत्रिमंडळ विस्तार नाही

कोण आहेत दीपक खरात?

दीपक खरात हे वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत आहेत. एक फेब्रुवारी २००२ पासून ते सेवेत आहेत. सध्या वालचंदनगर येथील पाठशाळा क्र. 3 येथे प्राथमिक शिक्षक म्हणून उपशिक्षक पदावर ते कार्यरत आहेत. त्यांची आतापर्यंतची सेवा २० वर्ष सहा महिने इतकी झालेली आहे.

Sharad Pawar : सरकार पडेल की नाही माहिती नाही, मात्र आम्ही निवडणुकांसाठी तयार

नुकतेच शिंदे गटात गेलेल्या शिवसेना खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर आंबेडकरी चळवळीतील नेत्या सुषमा अंधारे यांनीही शिवबंधन हाती बांधले आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी राजीनामा देणारा बहुधा खरात हे राज्यातील हा पहिलेच शिक्षक असावेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची सध्या एकाच चर्चा सुरू आहे.

WI vs IND T20 : केएल राहुलच्या जागी संजू सॅमसनला संधी!

Back to top button