

लोणावळा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरात मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी सकाळी 7 ते गुरुवारी सकाळी सात वाजेपर्यंतच्या 24 तासांत लोणावळा शहरात तब्बल 273 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे लोणावळ्यातील रस्ते जलमय झाले आहेत. शहरात मागील सलग तीन दिवस पावसाने 200 मिमी पावसाचा टप्पा ओलांडला आहे.
त्यामुळे यावर्षीच्या एकूण पावसाने दोन हजारी टप्पा पार केला असून, गुरुवारी (दि 20) सकाळअखेर एकूण 2017 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, केवळ मंगळवारी सकाळपासून गुरुवारी सकाळपर्यंतच्या 72 तासांत 705 मिलीमीटर पाऊस पडला आहे.
हेही वाचा