टोपी घालण्याचा नवा फंडा! आईच्या उपचाराच्या नावाखाली माधुरी मिसाळांसह ४ महिला आमदारांची फसवणुक | पुढारी

टोपी घालण्याचा नवा फंडा! आईच्या उपचाराच्या नावाखाली माधुरी मिसाळांसह ४ महिला आमदारांची फसवणुक

पुणे, पुढारी वृत्तसेवा : आईच्या उपचाराच्या नावाखाली एकाने आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह ४ महिला आमदारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आमदार माधुरी मिसाळ यांची कन्या पूजा मिसाळ (रा. कॅम्प) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मुकेश राठोड व गुगल पे फोन धारकावर गुन्हा दाखल केला आहे.

आमदार, खासदार गेले तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, संजय राऊतांचा दावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार माधुरी मिसाळ यांच्या मोबाईलवर मुकेश राठोड याने फोन केला. आपल्या आईला बाणेर येथील हॉस्पिटलमध्ये उपचाराकामी दाखल केले असून, तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्यांना एक गुगल पेचा नंबर देऊन त्यावर ३ हजार ४०० रुपये पाठविण्यास सांगितले. कोणीतरी गरजू असल्याचे वाटल्याने मिसाळ यांनी पैसे पाठविले.

Wardha Flood : वर्धा जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर, हिंगणघाटमधील ४७९ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले, बचावकार्य सुरु

काहीकाळानंतर त्यांच्या प्रमाणेच विधानसभेतील त्यांच्या सहकारी आमदार मेघना बोर्डिकर साकोरे, आमदार देवयानी फरांदे आणि आमदार श्वेता महाले यांच्याकडूनही अशा प्रकारे काही रक्कम घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर पूजा मिसाळ यांनी सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली होती.

पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता आरोपींनी ४ महिला आमदारांशी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पुढील तपासासाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

डासाने पकडून दिला चोर!

Back to top button