पुणे : गांजा तस्कर बोराकडून 23 किलो गांजा जप्त | पुढारी

पुणे : गांजा तस्कर बोराकडून 23 किलो गांजा जप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गांजाची तस्करी करणार्‍या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने लोणीकंद परिसरातून अटक केली. त्याच्याकडून 4 लाख 73 हजार रुपयांचा 23 किलो गांजा जप्त केला आहे. सुरज कांतीलाल बोरा (वय.23,रा. केसनंद फाटा वाघोली) असे त्याचे नाव आहे. बोरा याच्या विरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Eknath Shinde : बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री : एकनाथ शिंदे

पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेगळे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, कर्मचारी नितीन जगदाळे, युवराज कांबळे, साहिल शेख लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पथकाला लोणीकंद येथे एक व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून केसनंद फाट्याकडे जाणार्‍या रोडवर बोरा याला पकडले. त्याच्याकडे चौकशी करून अंगझडती घेतली असता 23 किलो गांजा मिळून आला.

COVID-19 Vaccine Booster dose : १८ वर्षांवरील नागरिकांना १५ जुलैपासून मोफत बूस्टर डोस

Back to top button