डॉक्टरी पेशाला काळीमा; अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी डॉक्टरला अटक | पुढारी

डॉक्टरी पेशाला काळीमा; अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी डॉक्टरला अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा: अल्पवयीन असताना मनक्याच्या आजाराच्या उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या मुलीवर डॉक्टरनेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या डॉक्टरने पीडित संबंधित मुलीचे मोबाईलमध्ये नग्न अवस्थेतील फोटो काढले आणि याविषयी कुणाला काही सांगितल्यास सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. डॉक्टर विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. डॉ. योगेश लक्ष्मण वाल्हे (45, भाऊ पाटील रोड, औंध पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत 19 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

हा प्रकार 10 नोव्हेंबर 2019 ते डिसेंबर 2020 दरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तरुणी डॉक्टरांकडे उपचारासाठी आली होती. यावेळी डॉक्टरांनी तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. अत्याचार करताना त्या तरुणीचे नग्नावस्थेत फोटो काढून घेतले. घडलेल्या प्रकारासंदर्भात कुटुंबीयांना अथवा कोणाला माहिती दिल्यास फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. मात्र तरुणीने धमकीला न जुमानता कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार कुटुंबीयांनी कोथरुड पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

हेही वाचा

अंधारी : शेतकर्‍याने दीड एकरातील टोमॅटो पीक उपटून फेकले

कार्ला : पावसामुळे भाजे धबधबा ओसंडून वाहू लागला

शिरगाव : पवन मावळात संततधार शेतकरी सुखावला

Back to top button