शिरगाव : पवन मावळात संततधार शेतकरी सुखावला | पुढारी

शिरगाव : पवन मावळात संततधार शेतकरी सुखावला

शिरगाव : पवन मावळात गेले दोन दिवस होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे या भागातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. गेले महिनाभर पाऊस नसल्याने शिरगाव,दारूब्रे,गहूंजे,सांगवडे,साळुंब्रे, सोमाटणेआदी गावातील शेतकरी हवालदिल झाला होता. गेले महिनाभर पाऊस नसल्यामुळे शेतात टाकलेली भाताची रोपे(दाड) उगवुन वरती येऊन लावण्यायोग्य झाली होती तरीही पाऊस येण्याची चिन्हे दिसत नव्हती. दाड वाया जाते की काय अशी भीती शेतकर्‍यांतून व्यक्त करण्यात येत होती.

परंतु गेले दोन पवन मावळ परिसरात सुरु असलेल्या संततधारेमुळे शेतात बर्‍यापैकी ओल झाली आहे. या ओलीवर पेरणीपूर्वी करण्यात येणार्‍या मशागती करता येतील, असे शेतक़र्‍यांनी सांगितले. भात लावणी म्हणजे या भागातील मुख्य काम आहे. त्यामुळे एकदा भाताची लावणीचे काम झाले की, उर्वरित कामे करण्यास शेतकरी प्राधान्य देतात. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होणार्‍या पावसाने पवन मावळातील शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात झालेल्या पावसाने शेतीत बर्‍यापैकी ओल निर्माण झाली आहे. या ओलीवर शेतकर्‍यांनी भात लावणी पूर्ण करण्यास हरकत नसल्याचे कृषी सहाय्यक अश्विनी खंडागळे यांना सांगितले.

Back to top button