कार्ला : पावसामुळे भाजे धबधबा ओसंडून वाहू लागला | पुढारी

कार्ला : पावसामुळे भाजे धबधबा ओसंडून वाहू लागला

कार्ला : मावळात पावसाचे आगमन झाले की पर्यटक वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी भाजे धबधबा वाहण्याची वाट पाहत असतात. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोराच्या पावसामुळे भाजे धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. मावळात पावसाचा जोर वाढल्याने परिसरातील डोंगर हिरवाईने नटू लागले आहेत.

संततधार पावसामुळे परिसरात धुक्याची दुलाई निर्माण होत आहे. भाजे धबधब्यावरुन पाणी वाहू लागल्याने आता पर्यटकांची प्रतीक्षा संपली असून, अनेक उत्साही पर्यटक भाजे धबधब्यावर येत असून, वर्षाविहाराचा आनंद लुटत असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button