बुडत्या पुण्याला केंद्राच्या निधीचा आधार ; पूर नियंत्रणासाठी मिळणार 250 कोटी
पुणे : मागील काही वर्षापासून लहान मोठ्या पावसात शहरात पूरस्थिती निर्माण होत आहे. पाणी साचण्याचे प्रमाण दरवर्षी वाढतच असून पावसाच्या पाण्यात बुडणार्या पुण्याला केंद्र सरकारच्या अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंट (शहरी पूर जोखीम व्यवस्थापन) अंतर्गत 250 कोटींचा निधी मिळणार आहे. अतिवृष्टीमुळे शहरात विविध ठिकाणी पाणी साठण्याच्या घटना घडतात. बाधित होणार्या ठिकाणाचा पालिकेने तज्ज्ञ सल्लागाराची नेमणुक करून सर्वे केला आहे.
सर्वेक्षणा नुसार शहरात 350 गंभीर पाणी साचण्याची ठिकाणे आढळली असून त्यासंदर्भात करण्याच्या उपयोजनांसंदर्भात तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार केला आहे. केंद्र शासनाकडून मोठ्या शहरांसाठी अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंट योजना प्रस्तावित आहे. या योजनेंतर्गत 2021-2026 या कालावधीसाठी 14 व्या व 15 व्या वित्त आयोगांर्तगत निधी दिला जाणार आहे. केंद्राच्या सूचनेनुसार पुणे पालिकेने हा आराखडा तयार केलेला असून, त्यासाठी सी-डॅकची मदत घेतली. सादरीकरण राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला करण्यात आले. त्यामुळे या वर्षात 50 कोटींचा निधी मिळमार असल्याचे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांनी सांगितले.
हे ही वाचा :

