गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना विशेष नृत्यातून भावांजली

पुणे : पुढारी वृत्तसेवा: आविष्कार मंडळांतर्गत नृत्यकला आविष्कार अकादमीतर्फे (सिंहगड रस्ता) भरतनाट्यम उत्सव 2022 कार्यक्रम आयोजित केला होता. कलाकारांनी आपल्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. नटराज पूजन झाल्यावर भरतनाट्यम मार्गम नृत्य प्रस्तुत झाले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना विशेष नृत्यातून भावांजली अर्पण करण्यात आली.
अनुया जोशी यांनी ‘सुंदर ते ध्यान’ अभंग सादर केला. उत्कृष्ट विद्यार्थीचा बहुमान सई माने, तर ऑल राऊंडर स्टुडंट ट्रॉफी श्रेया यादव या विद्यार्थिनीने मिळवली. डॉ. मीनल कुलकर्णी, डॉ. अपेक्षा रणधीरे, एम. व्ही. देशमुख उपस्थित होते. बहारदार संचलन अमूल्यश्री जोशी हिने केले, तर चिन्मयी पेंडसे हिने आभार मानले. जिज्ञासा अनपट, श्रद्धा मांडे, स्नेहा अष्टुरे, मैथिली वाघमारे, मंदार जोशी यांचे सहकार्य केले.
हेही वाचा
रंगला मुलांचा कौतुक सोहळा; बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
योजनांसाठी स्वतंत्र संचालनालय; प्रौढ शिक्षण संचालनालयाचे नामांतर
33 लाख वीजमीटर लवकरच उपलब्ध; नवीन स्मार्ट मीटर खरेदीच्या निविदाप्रक्रिया प्रगतिपथावर