कांद्याची आवक वाढली; भावही वधारले बटाटा, लसूण व हिरव्या मिरचीचे भाव स्थिर

कांद्याची आवक वाढली; भावही वधारले बटाटा, लसूण व हिरव्या मिरचीचे भाव स्थिर

अविनाश दुधवडे

चाकण : पुढारी वृत्तसेवा: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भाव वधारले. बटाटा, लसूण व हिरव्या मिरचीचे भाव या आठवड्यात स्थिर राहिले. जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. फळभाज्या व पालेभाज्यांची मोठी आवक होऊन भाव तेजीत राहिले. गुरांच्या बाजारात गाई, बैल व शेळ्या – मेंढ्यांची आवक वाढली. एकूण उलाढाल 4 कोटी 20 लाख रुपये झाली. चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 1,750 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 250 क्विंटलने वाढून भावात 50 रुपयांची वाढ झाली.

कांद्याचा कमाल भाव 1,600 रुपयांवरून 1,650 रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक 2,000 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 100 क्विंटलने घटून भाव 2,000 रुपयांवर स्थिरावले. लसणाची एकूण आवक 25 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून भावही 5 हजार रुपयांवरच स्थिरावले. हिरव्या मिरचीची एकूण आवक 308 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 11 क्विंटलने वाढली; मात्र भाव स्थिर राहिले. हिरव्या मिरचीला 4,000 रुपयांपासून 5,000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे
कांदा – एकूण आवक – 1,750 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,650 रुपये, भाव क्रमांक 2. 1,400 रुपये, भाव क्रमांक 3. 1,000 रुपये.
बटाटा – एकूण आवक – 2,000 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2,000 रुपये, भाव क्रमांक 2. 1,750 रुपये, भाव क्रमांक 3. 1,500 रुपये.
फळभाज्या : एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे -टोमॅटो – 172 क्विंटल (3,500 ते 4,500 रू ), कोबी – 166 (1 ते 2 हजार), फ्लॉवर – 190 (1 ते 1,500 रु.), वांगी – 89 (1,500 ते 2,500), भेंडी – 59 (4 ते 5 हजार), दोडका – 56 (2 ते 3 हजार ), कारली – 46 (2,500 ते 3,500), दुधीभोपळा – 59 (500 ते 1,500), काकडी – 65 (1 ते 2 हजार), फरशी – 15 (10 ते 12 हजार), वालवड – 25 (4 ते 6,500 रु.), गवार – 50 (3 ते 4 हजार), ढोबळी मिरची – 92 (3 ते 5 हजार), चवळी – 26 (2 ते 3 हजार), वाटाणा – 43 (10 ते 12 हजार) , शेवगा – 22 (4 ते 5 हजार), गाजर – 70 (1,500 ते 2,500).
पालेभाज्या : एकूण आवक जुड्यांमध्ये व कंसात भाव – मेथी – एकूण 8 हजार 530 जुड्या (1,500 ते 2,500 रुपये), कोथिंबीर – एकूण 26 हजार 650 जुड्या ( 1,000 ते 2,000 रुपये), शेपू – एकूण 3 हजार 850 जुड्या ( 800 ते 1,000 रुपये), पालक – एकूण 3 हजार 630 जुड्या (800 ते 1,000 रुपये).
जनावरे : 87 पैकी 60 जर्शी गाईंची विक्री (15 ते 50 हजार), 125 पैकी 90 बैलांची विक्री (10 ते 40 हजार), 180 पैकी 170 म्हशींची विक्री (20 ते 60 हजार), 12,070 शेळ्यापैकी 11,750 शेळ्यांची विक्री (2 ते ते 20 हजार).

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news