मोबाईल चोरी करणार्‍या टोळीला अटक | पुढारी

मोबाईल चोरी करणार्‍या टोळीला अटक

दौंड : पुढारी वृत्तसेवा: दौंड शहर व रेल्वे स्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करणार्‍या आंतरराज्य टोळीला दौंड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 14 लाख रुपये किमतीचे 101 मोबाईल संच जप्त केले. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी ही माहिती दिली. सोमरा नगर मोदी (वय 26, रा. आमदरा, जि. सरकेला, झारखंड), आकाश दिलीप मोदी (वय 25, रा. आमदरा), चंदन नगर मोदी (वय 22, रा. आमदरा) अशी यातील तिघांची नावे आहेत. तर तीन आरोपी अल्पवयीन असल्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्यांची नावे सांगितली नाहीत. आरोपींनी इटारसी, अमरावती, नागपूर, जळगाव, भुसावळ व नाशिक येथून मोबाईल चोरल्याचे सांगितले.

दौंड शहरात शुक्रवारी (दि. 24) सकाळी सुनील गणपत जाचक (रा. गणेश सोसायटी, सरपंच वस्ती, दौंड) यांच्या घरात घुसून त्यांनी चाकूचा धाक दाखविला. जाचक यांनी दौंड पोलिसांशी तातडीने संपर्क केल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. या टोळीकडून आणखी काही मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे धस यांनी सांगितले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलिस उपनिरीक्षक सतीश राऊत, सहाय्यक फौजदार दिलीप भाकरे, सहाय्यक फौजदार महेंद्र गायकवाड, हवालदार पांडुरंग थोरात, सुभाष राऊत आदींनी केली.

हेही वाचा

नगर : कपाशीची 20 हजार हेक्टरवर लागवड!

तीन ठिकाणी अवैध धंद्यांवर छापे; भोर पोलिसांची कारवाई; 30 हजारांचा मुद्दे माल जप्त

बँकेचे लॉकरदेखील आता सुरक्षित नाही ; बँकेतून दागिने लंपास

Back to top button