तीन ठिकाणी अवैध धंद्यांवर छापे; भोर पोलिसांची कारवाई; 30 हजारांचा मुद्दे माल जप्त | पुढारी

तीन ठिकाणी अवैध धंद्यांवर छापे; भोर पोलिसांची कारवाई; 30 हजारांचा मुद्दे माल जप्त

भोर : पुढारी वृत्तसेवा: भोर पोलिसांनी सलग तीन दिवस तीन अवैध धंद्यांवर कारवाई केली. यामध्ये 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत मिळालेल्या माहितीवरून पोम्बर्डी (ता. भोर) गावच्या हद्दीत बुधवारी (दि. 22) हॉटेल रायगडजवळील चिकनच्या दुकानामागील बाजूस आडोशास अंकुश रावबा दिघे (वय 36, रा. शिरगाव, ता. भोर) याच्या ताब्यातील देशी-विदेशी दारूच्या एकूण 14 बाटल्या (किंमत 1570 रुपये) असा मुद्देमाल जप्त केला.

दुसऱ्या घटनेत पांगारी (ता. भोर) हद्दीत गुरुवारी (दि. 23) गुराच्या गोठ्याच्या मागील बाजूस भिंतीच्या आडोशास सुरेश शबाजी दुरकर (वय 45, रा. पांगारी) आणि गणेश कंक यांच्या भाड्याच्या खोलीत देशी-विदेशी दारूच्या एकूण 53 बाटल्या (किंमत 5,535) जप्त केल्या. तसेच शुक्रवारी (दि. 24) कुरुंजी (ता. भोर) हद्दीत बाप्पू रामचंद्र उल्हाळकर (वय 47, रा. कांबरे खा., ता. भोर) यांच्याकडून देशी-विदेशी दारूच्या एकूण 318 बाटल्या (किंमत 23,240 रुपये) असा बेकायदा माल मिळून आला.

या दारूधंद्याचा मालक अमोल दिवाणजी अलगुडे (रा. वडगाव झांजे, ता. वेल्हे) असून, आरोपीवर महाराष्ट्र (मुंबई) दारू बंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) प्रमाणे कारवाई केली आहे. भोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक, बळीराम सांगळे, सहायक फौजदार अशोक खुटवड, पोलिस हवालदार उध्दव गायकवाड, विकास लगस, दत्तात्रय खेंगरे यांच्या पथकाने कारवाई केली.

हेही वाचा

फडणवीस मुख्यमंत्री, शिंदे उपमुख्यमंत्री!

पक्षांतर करणार्‍या आमदारांवर पाच वर्षांसाठी बंदी ; सर्वोच्च न्यायालयात अर्ज

बीड : लुटीत फिर्यादी निघाला आरोपी

Back to top button