‘खते, बियाण्यांची पुरेशी उपलब्धता’ | पुढारी

‘खते, बियाण्यांची पुरेशी उपलब्धता’

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ‘जिल्ह्यात पूर्व भागात केवळ दोन टक्के क्षेत्रावर खरिपातील पेरण्या झाल्या आहेत. मात्र, खरिपाच्या पेरणीसाठी आवश्यक बियाणे व खतांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख यांनी दिली. ‘पाऊस चांगल्या प्रमाणात पडला नाही तर उडीद, मूग पिकाच्या लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भात पिकाच्या क्षेत्रात मात्र फरक पडणार नाही. जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत,’ असे सांगून देशमुख म्हणाले, ‘जिल्ह्यात भात पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र आहे. पाऊस नसल्याने त्याचा रोपवाटिकांवर थोडा परिणाम झाला आहे.

पावसात खंड पडल्यास गादीवाफ्यांवरील रोपवाटिकांना फारसा फटका बसत नाही. त्यामुळे यंदाही भाताच्या रोपवाटिकांबाबत तीच स्थिती आहे. पाऊस लांबल्याने उडीद, मुगाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. शिरूर भागात या पिकांचे क्षेत्र जास्त आहे. पाऊस आणखी लांबल्यास या पिकांखालील क्षेत्र बाजरी पिकाकडे वळवले जाते. त्यानंतर रब्बी ज्वारी पेरली जाते. भाताच्या रोपवाटिका पारंपरिक, गादीवाफे, एसआरटी व यांत्रिकीकरणाद्वारे किंवा मॅट पद्धतीने केल्या जातात. त्यात गादीवाफ्याने रोपवाटिका करण्याकडे शेतकर्‍यांचा अधिक कल असतो.’

हेही वाचा

बेळगाव : बस दरात कपात, पण पक्षपात!

सीओईपीही होणार ‘तंत्रज्ञान विद्यापीठ’

आसामात पूरबळी संख्या 108 वर

Back to top button