सासवड पालखीतळाची पाहणी

सासवड पालखीतळाची पाहणी
Published on
Updated on

नारायणपूर : पुढारी वृत्तसेवा: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (दि. 24) त्यांचे धाकटे बंधू संत सोपानकाका महाराज यांच्या सासवड नगरीत विसावणार आहे. यानिमित्ताने गुरुवारी (दि. 23) पुरंदर- हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी पालखी तळावरील तयारीचा आढावा घेतला. सासवडला माउलींची पालखी शुक्रवार (दि. 24) व शनिवारी (दि. 25) मुक्कामी येणार आहे. या सोहळा काळात पालखी तळावर विद्युत, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, आपत्कालीन व्यवस्थेबाबत संबंधित अधिकारी यांना आमदार संजय जगताप यांनी सूचना केल्या.

या वेळी तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, पालिका मुख्याधिकारी निखिल मोरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेंद्र पाटील, पालिका आरोग्यप्रमुख मोहन चव्हाण, पालिका पाणीपुरवठा अभियंता रामानंद कळसकर, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे आदी उपस्थित होते पालखी तळावर मुरमीकरण, खड्डे, ड्रेनेज, गटारे दुरुस्ती केली आहेत. पावसामुळे ड्रेनेज, गटारे तुंबणार नाहीत, याची खबरदारी घेतली आहे.

या परिसरात 1 हजार मुव्हींग टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली. पालखी सोहळ्यात नगरपालिकेचे 150 कर्मचारी व वाघिरे महाविद्यालयातील एनसीसीच्या 100 विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. तसेच तळावर पाण्याचे 10 कोंढाळे सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती पालिका मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली. या वेळी यशवंतकाका जगताप, संजय ग. जगताप, अजित जगताप, विजय वढणे, सुहास लांडगे, मोहन जगताप, दीपक टकले, बाळासाहेब पायगुडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news