आमदार सावंतांविरोधात कात्रज चौकात निदर्शने

कात्रज चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
कात्रज चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

कात्रज : पुढारी वृत्तसेवा: राज्यातील राजकीय घडामोडीचे पडसाद पुणे शहरासह उपनगरात उमटू लागले आहेत. कात्रज येथे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या शिक्षण संस्था कार्यालय व निवासस्थान आहे. त्यामुळे बंडखोर आमदार म्हणून तानाजी सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडखोरी विरोधात कात्रज चौकामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते भगवे झेंडे घेऊन या बंडखोर नेत्यांचा निषेध व त्यांच्या विरोधात आंदोलन करताना दिसले.

यावेळी काही शिवसेनेचे कार्यकर्ते हे तानाजी सावंत यांच्या कात्रज चौकातील शिक्षण संस्थेच्या कार्यालयावर चाल करून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिस प्रशासनाने वेळीच त्यांना रोखले. यावेळी कार्यकर्त्यांनी आम्ही शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत कायम आहोत व आम्हाला शिवसैनिक म्हणून समाजसेवा हेच आमचे काम आहे, असे सांगत होते.
यावेळी संभाजी थोरवे, विनोद साळुंखे, सूरज लोखंडे, नीलेश गिरमे, शिवसेना आयटी सेलचे प्रमुख पराग थोरात, निरंजन कुलकर्णी, अनिल बटाने, अमोल रासकर, किशोर राजपूत, सचिन जोगदंड, माउली दारवटकर व बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news