स्वागतासाठी वडकीकर सज्ज; दिवेघाटात तगडा पोलिस बंदोबस्त | पुढारी

स्वागतासाठी वडकीकर सज्ज; दिवेघाटात तगडा पोलिस बंदोबस्त

फुरसुंगी : वडकी नाला येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शुक्रवारी (24 जून) दुपारी विसाव्याच्या ठिकाणी येत आहे. वारकरी बांधव व भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. पालखी विसाव्याच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, आरोग्याची सुविधा, फिरते शौचालय प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी दिली. यांनी या ठिकाणी पाहणी केली. या प्रसंगी तहसीलदार तृप्ती कोलते, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, वडकीचे सरपंच अरुण गायकवाड, बाळासाहेब साबळे उपस्थित होते.

दिवेघाटातील गर्दीवर लक्ष..
दिवे घाटातील नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होते. त्यासाठी पोलिस यंत्रणेने विशेष उपाययोजना केल्याचे याप्रसंगी तहसीलदार तृप्ती कोलते यांनी सांगितले. वडकीचे सरपंच अरुण गायकवाड म्हणाले की, पालखी विसाव्याच्या ठिकाणी दीड-दोन तास थांबते. यावेळी भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी दर्शनबारीची व्यवस्था केली आहे. विसाव्यानंतर दिवे घाटात माउलींच्या रथाला मानाच्या पाच बैलजोड्या आणि इतरही शेतकरी बैलजोड्या घेऊन येतात. उरुळीची पालिका हद्द संपून पालखी वडकी ग्रामपंचायत हद्दीत प्रवेश करत असल्याने यंदा प्रथमच जिल्हा प्रशासनाच्या वतीने वडकी नाला याठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे.

हेही वाचा

नगर : बनावट दस्तावेजावर प्लॉटची परस्पर विक्री

टाळ म्हणे चिपळीला.. नाच माझ्या संगे; गल्लीबोळात विठूनामाचा गजर

गुजरात दंगल प्रकरण : पंतप्रधानांना मोठा दिलासा; झाकिया जाफरी यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Back to top button