नरेश्वर डोंगरावर आढळल्या दुर्मीळ पाली | पुढारी

नरेश्वर डोंगरावर आढळल्या दुर्मीळ पाली

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा: सणसवाडी (ता. शिरूर) येथील नरेश्वर डोंगरावर बुधवारी (दि. 22) सकाळच्या सुमारास काही सर्पमित्र गेले असता, त्यांना बिबट्याच्या रंगासारख्या दिसणार्‍या दुर्मीळ लेपर्ड गेको जातीच्या पाली आढळून आल्या आहेत. सणसवाडी येथील नरेश्वर डोंगरावर सकाळच्या सुमारास सर्पमित्र श्रीकांत भाडळे, शेरखान शेख आणि अमोल कुसाळकर हे गेले होते. तेथे त्यांना एका खडकावर बिबट्याच्या अंगावरील नक्षीप्रमाणे सरपटणारा प्राणी दिसून आला.

त्यांनी लगेचच त्याचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेत वन्य जिवांचा अभ्यासक असलेले पुणे येथील सर्प अभ्यासक अमर गोडांबे व शिर्डी येथील संदीप खिरे यांना पाठवले. येथे दिसून आलेल्या पाली दुर्मीळ व बिबट्याच्या रंगासारख्या दिसणार्‍या लेपर्ड गेको जातीच्या असल्याचे अमर गोडांबे व संदीप खिरे यांनी सांगितले. या वेळी सर्पमित्रांना मार्गदर्शन करताना डोंगराळ भागात असलेले कीटक, विंचू हे या पालींचे खाद्य असल्यामुळे या पाली डोंगरावरच वास्तव्य करतात.

तसेच पुणे जिल्ह्यात अनेक दिवसांपूर्वी बारामती येथेदेखील या पाली आढळून आलेल्या असल्याचे सर्प अभ्यासक अमर गोडांबे यांनी सांगितले. आम्हाला दुर्मीळ जातीच्या पाली प्रत्यक्ष पाहता आल्याचे समाधान मिळाल्याचे सर्पमित्र श्रीकांत भाडळे, शेरखान शेख आणि अमोल कुसाळकर यांनी सांगितले.

हेही वाचा

संतापजनक : तेरा वर्षीय मुलीवर घरात घुसून अत्याचार

नाशिक : दागिने चोरून विवाहिता दुसर्‍याच व्यक्तीसोबत झाली पसार

येथे कर माझे जुळती; पाचाड येथील राजमाता जिजामाता राजवाडा आणि समाधीस्थळ

Back to top button