वडापाव खातानाच लुटले; शहरात चोरीच्या घटना सुरूच | पुढारी

वडापाव खातानाच लुटले; शहरात चोरीच्या घटना सुरूच

पुणे : पुढारी वृत्तसेवा: शहरातील विविध भागांत जबरी चोरीच्या तीन घटनांत चोरट्यांनी रोकड व सोन्याचे दागिने हिसकावले.
शिवाजीनगर येथील मंगला टॉकीजकडे जाणार्‍या रोडच्या बाजूला एका टपरीजवळ वडापाव खात थांबलेल्या एका प्रवाशाला रिक्षातून आलेल्या तिघांनी लुटले. याप्रकरणी, वैभव कदम (वय 25, रा. चापेकर चौक, पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. चोरट्यांनी फिर्यादींच्या खिशातील रोकड व मोबाईल हिसकावला.

नाल्याजवळ थांबलेल्या एका व्यक्तीला धक्का मारून नाल्यात पाडल्यानंतर गळ्यातील दीड लाख रुपयांच्या दोन सोनसाखळ्या चोरट्यांनी चोरी केल्या. ही घटना मंगळवारी दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास कर्वे रोड मृत्युंजय मंदिराजवळील पुलावर घडली. याप्रकणी उदय पेंडसे (वय 57, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अलंकार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारचा धक्का लागल्याचे सांगून तिघांनी एका व्यक्तीला मारहाण करून लुटले. ही घटना खडकी बाजार परिसरात दोन दिवसांपूर्वी सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी प्रसन्नजित बाबूल बिस्वास (वय 24, रा. सुभाषनगर, अंधेरी मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार खडकी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे चारचाकी गाडीतून मेडिकलचे साहित्य घेऊन अंधेरी येथून कोरेगाव पार्क परिसरात निघाले होते. एलफिन्स्टन रोड खडकी बाजार येथे आरोपीने फिर्यादीच्या गाडीचा धक्का लागल्याचे सांगून त्यांना थांबवले. त्यानंतर त्यांना शिवीगाळ व मारहाण करून 4 हजार 500 रुपयांची रोकड घेतली. त्यानंतर गुगल-पेद्वारे 3 हजार 22 रुपये ट्रान्सफर करायला भाग पाडले. तसेच, 500 रुपये किमतीचे ब्लूटूथ हेडफोन असा 8 हजार 22 रुपयांचा ऐवज लांबवला.

हेही वाचा

खरिपासाठी 60 टक्के पीककर्ज वाटप पूर्ण

अभियंत्याला 48 लाखांचा गंडा; अधिकार्‍यांशी ओळख असल्याचे सांगत परताव्याच्या आमिषाने फसवणूक

परभणी : मुलींच्या वसतिगृहांसाठी एक कोटी; उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन

Back to top button