नगर : पोलिसांना चकवा देत डिझेल चोर पसार; वाहन सापडले पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

नगर : पोलिसांना चकवा देत डिझेल चोर पसार; वाहन सापडले पोलिसांच्या ताब्यात

जेऊर: पुढारी वृत्तसेवा: महामार्गांवर रात्रीच्या वेळेस डिझेल चोरणार्‍या टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या असून सोमवारी पहाटेच्या सुमारास एक टोळी पोलिसांच्या टप्प्यत आली. पाठलागानंतर डिझेल चोर पसार झाले असून त्यांचे वाहन मात्र पोलिसांच्या ताब्यात सापडले आहे. दोन दिवसांपूर्वीच नेवाशाचे पोलीस निरीक्षक विजय करे यांना चोरांनी पोलिसांना जखमी केले होते. त्यातील आरोपींचा छडा लागला असला तरी डिझेल चोरीच्या टोळ्या अद्यापही सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.

सोमवार (दि.20) पहाटे चारच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनील कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, राजू वाघ, संजय खंडागळे, बापूसाहेब फोलाने, भिमराज खर्से, रणजीत जाधव यांचे पथक मध्यप्रदेश कडे जात असताना नगर-मनमाड महामार्गावर बडाख पेट्रोल पंपावर काही इसम ट्रकच्या आडोशाला पांढर्‍या रंगाची स्कॉर्पिओ लावून ट्रकमधील डिझेल चोरत असताना दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच डिझेल चोर राहुरीच्या दिशेने सुसाट वेगात निघाले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास यंत्रणा तसेच नियंत्रण कक्षात कळवून जिल्ह्यात पोलीस स्टेशनला अलर्ट करण्यात आले. शनिशिंगणापूर फाट्यावर एलसीबीचे पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव यांना नाकाबंदी करण्यास सांगण्यात आले. स्कॉर्पिओ गाडी तसेच रोडला बॅरिगेट लावून त्यांनी नाकाबंदी केली. परंतु डिझेल चोरांनी स्कॉर्पिओ गाडीला जोराची ठोकर देत शिंगणापूरकडे पलायन केले. सोनईमध्ये नाकाबंदीने समोर रस्ता बंद दिसताच डिझेल चोरांनी गाडी पुन्हा राहुरीच्या दिशेने पळवली.

पृथ्वीवरील उल्केने उलगडले मंगळाचे रहस्य

डिझेल चोरांनी पोलिसांना चकवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु सर्वत्र नाकाबंदी आणि पाठीमागे एलसीबीचे पथक यामुळे नाविलाजास्तव डिझेल चोरांनी गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. पोलीसांनी डिझेल चोरांची स्कॉर्पिओ गाडी हस्तगत केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासाबाबत सूचना दिल्या. सदर घटनेबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.

पोलिसांच्या गाडीवर डिझेलचा फवारा
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक डिझेल चोरांच्या गाडीचा पाठलाग करत असताना डिझेल चोरांकडून पोलिसांच्या गाडीवर, काचावर चालकास दिसू नये या उद्देशाने डिझेलचा फवारा मारण्यात येत होता. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तशाही परिस्थितीत न डगमगता आपला पाठलाग सुरूच ठेवला, व आपले ध्येय गाठले.

गुन्हेगारांनी घेतला स्थानिक गुन्हे शाखेचा धसका
स्थानिक गुन्हे शाखेची पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या नेतृत्वाखालील टीम अप्रतिम अशी कामगिरी करत आहे. दोन दिवसांपूर्वी वांजोळी शिवारात डिझेल चोरांना फिल्मी स्टाईल पाठलाग करून पकडले होते. तर आज पुन्हा त्याच प्रकारे डिझेल चोर पसार झाले असले तरी त्यांची गाडी हस्तगत करण्यात आली आहे. एकंदरीत रस्ता लूट, डिझेल चोर, गावठी कट्ट्यातील गुन्हेगारांनी एलसीबीच्या टिमचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा

नगर : केंद्रीय यंत्रणेकडून ‘मुळा’ची पाहणी; मंत्री शंकरराव गडाख यांच्या अडचणीत वाढ

शिवसेनेकडून बुलडाणा हस्तगत करण्याचा प्रयत्न

राज्यातील राजकीय परिस्थिती पाहूनच निर्णय : बाळासाहेब थोरात

Back to top button