पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल | पुढारी

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल

पुणे: पुढारी वृत्तसेवा संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील बंद रस्ते – पर्यायी मार्ग

  • बोपोडी चौक ते खडकी बाजार – अंतर्गत रस्त्याने चर्चचौक
  • पोल्ट्री चौकाकडे येणारी वाहतूक – रेल्वे पोलिस मुख्यालयासमोरून औंध रस्ता, ब्रेमेन चौकातून पुढे
  • जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक बंद – बोपोडी चौकातून भाऊ पाटील रस्त्याने औंधमार्गे पुढे
  • आरटीओ ते अभियांत्रिकी महाविद्यालय चौक – आरटीओ, शाहीर अमर शेख चौक, कुंभार वेस
  • सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट चौक – पर्णकुटी चौक, बंडगार्डन पूल, महात्मा गांधी चौकमार्गे पुढे

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील बंद रस्ते – पर्यायी मार्ग

  • आळंदीकडे जाणारे रस्ते बंद – अंतर्गत व पर्यायी रस्त्यांचा वापर करावा
  • कळसफाटा ते बोपखेल फाटा, विश्रांतवाडी चौक – धानोरी रस्त्याने अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा.
  • मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, आळंदी रोड जंक्शन – जेल रोड, विमानतळमार्गे पुढे
  • सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट – पर्णकुटी चौक, गुंजन चौक, जेल रस्ता, गॅरिसन इंजिनिअरिंग चौक, विश्रांतवाडी चौक

उद्या दुपारी 12 वाजल्यापासून बंद राहणारे रस्ते व पर्यायी मार्ग

  • रेंजहिल्स चौक ते संचेती चौक (गणेशखिंड रस्ता) – रेंजहिल्स, खडकी पोलिस ठाणे, सेनापती बापट रस्ता, नळस्टॉप चौक
  • खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (फर्ग्युसन रस्ता) – खंडोजीबाबा चौक, कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल्स
  • गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे पुतळा (छत्रपती शिवाजी महाराज रस्ता) – गाडगीळ पुतळा, कुंभार वेस, आरटीओ चौक, जहांगीर रुग्णालय मार्गे पुढे
  • वीर चापेकर चौक ते वाकडेवाडी भुयारी मार्ग – रेंजहिल्स किंवा औंधमार्गे पुढे
  • डेक्कन वाहतूक विभाग ते थोपटे पथ (मॉडर्न महाविद्यालय रस्ता) – घोले रस्ता व आपटे रस्ता

कृषी महाविद्यालय चौक ते लक्ष्मी रस्ता – (भवानी पेठ/नाना पेठ)

  • फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता – शास्त्री रस्ता, म्हात्रे पूल, नळ स्टॉप, सेनापती बापट रस्ता
  • लाल बहादूर शास्त्री रस्ता – म्हात्रे पूल, गरवारे महाविद्यालय, नळस्टॉप मार्गे पुढे
  • टिळक रस्ता-विश्व हॉटेल, ना. सी. फडके चौक, म्हात्रे पूल, नळस्टॉप
  • छत्रपती शिवाजी महाराज रस्ता – फुटका बुरुज, गाडगीळ पुतळा, नदी पात्रातील रस्ता
  • लक्ष्मी रस्ता – राष्ट्रभूषण चौक हिराबाग, म्हात्रे पूल, नळस्टॉप व बेलबाग चौक, रामेश्वर चौक, बाजीराव रस्ता.

हेही वाचा

परभणी : संत गजानन महाराज, संत गुलाबराव महाराज दिंडीचे आगमन; हजारो भाविकांनी घेतले दर्शन

पैठण : ’भानुदास एकनाथ’च्या गजरात पालखीचे प्रस्थान

योगोपचाराने मधुमेहाला ’बाय बाय’; 70 टक्के मधुमेही रुग्णांवर परिणाम

Back to top button