कोर्‍हाळ्यातील सिद्धेश्वर दिंडीचे प्रस्थान | पुढारी

कोर्‍हाळ्यातील सिद्धेश्वर दिंडीचे प्रस्थान

वडगाव निंबाळकर: पुढारी वृत्तसेवा: कोर्‍हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील श्री सिद्धेश्वर प्रासादिक दिंडीचे सोमवारी (दि. 20) आळंदीकडे हरिनामाच्या गजरात प्रस्थान झाले. सकाळी ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते श्री सिद्धेश्वरास अभिषेक करण्यात आला. मानकर्‍यांचा प्रथेप्रमाणे पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप धापटे, सोमेश्वरचे संचालक सुनील भगत, माजी संचालक लालासो माळशिकारे, सरपंच रवींद्र खोमणे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे पायी वारीला मर्यादा आल्या होत्या. यंदा कोरोनाचे संकट टळल्याने भाविक मोठ्या संख्येने दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. सोमवारी सायंकाळी ही दिंडी आळंदीत दाखल होईल. तेथून संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरकडे मार्गस्थ होईल, अशी माहिती दिंडीप्रमुख दत्तात्रय गावडे, दत्तात्रय भोसले व रामभाऊ खोमणे यांनी दिली.

हेही वाचा

Gadchiroli : मध्यप्रदेशातील चकमकीत गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी ठार

रामराजेंची विधानपरिषदेची हॅटट्रिक

पहिल्या मुक्कामासाठी आजोळघरी लगबग; भाविकांना दर्शनबारी मंडपात घेता येणार माउलींचे दर्शन

Back to top button