बाणखेलेच्या खुनाची कबुली; संतोष जाधवने तपासात केले उघड | पुढारी

बाणखेलेच्या खुनाची कबुली; संतोष जाधवने तपासात केले उघड

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात संशयित आणि . ओंकार बाणखेले खून प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष जाधव याने मध्य प्रदेशातून पिस्तूल आणत त्याचा वापर बाणखेलेच्या खुनासाठी केला असल्याची कबुली दिली आहेमध्य प्रदेशातील ‘जॅक स्पॅरो’नामक व्यक्तीकडून त्याने पिस्तूल मिळविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विशेष न्यायालयाला दिली.

कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा साथीदार विक्रम ब्रारने संतोषला मध्य प्रदेशात दोन पिस्तुले व दारूगोळा आणण्यासाठी पाठविले होते. त्यापैकी एका पिस्तुलाचा वापर बाणखेलेच्या खुनासाठी करण्यात आल्याचे संतोषने पोलिसांना सांगितले आहे. याशिवाय संतोष जाधवच्या टोळीतील सदस्यांकडून 13 पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.

गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी न्यायालयाने संतोष सुनील जाधव (वय 27, रा. पोखरी, आंबेगाव, सध्या रा. मंचर) आणि त्याला फरारी असताना आश्रय देणारे सिद्धेश कांबळे ऊर्फ सौरभ महाकाल (वय 19, रा. नारायणगाव, जुन्नर), नवनाथ सुरेश सूर्यवंशी (वय 28, विखले, खटाव, सातारा, सध्या रा. भूज, गुजरात) आणि तेजस कैलास शिंदे (वय 22, रा. नारायणगाव, जुन्नर) यांना 27 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

सातार्‍यात 100 खाटांचे ईएसआय हॉस्पिटल

गेल्या वर्षी एक ऑगस्टला आंबेगावमधील एकलहरे गावात ओंकार बाणखेलेचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.ओंकार बाणखेलेचा खून केल्यानंतर संतोषने देशात विविध ठिकाणी बिष्णोई टोळीच्या सदस्यांकडे वास्तव्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पथके या ठिकाणी तपासासाठी तैनात करण्यात आली असून, संतोषच्या टोळीतील साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

आरोपी नवनाथ सूर्यवंशी बाणखेलेच्या खुनाच्या घटनेवेळी पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास होता, त्या दरम्यान तो संतोष व त्याच्या साथीदारांच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. सिद्धेश कांबळे आणि तेजस शिंदे यांनी संतोषला फरारी असताना लपून राहण्यास मदत केली आहे. त्याबाबत तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी वकील बोंबटकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

‘काम झाले आहे, साडेतीन लाख रुपये मिळाले’
पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावात सिद्धू मुसेवाला याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घटनेच्या चार दिवसांनंतर (दि. 1 जून) नवनाथ सूर्यवंशी याने सिद्धेश कांबळेला सिग्नलवर कॉल करून, ‘काम झाले आहे, साडेतीन लाख रुपये मिळाले आहेत,’ असे सांगून बँक खाते क्रमांक मागितला, तसेच आपण गुजरातमध्ये असून, संतोष पण इथे येणार आहे, असे सांगितले होते.

हेही वाचा

 राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीस गोपाळकृष्ण गांधींचाही नकार

घोसरवाड ग्रा. पं. सदस्यासह दोघांना खंडणीप्रकरणी अटक

महाबळेश्वर : चक्क धो धो पावसात डांबरीकरण

Back to top button