राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीस गोपाळकृष्ण गांधींचाही नकार | पुढारी

 राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीस गोपाळकृष्ण गांधींचाही नकार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला यांनी राष्ट्रपतिपदासाठी विरोधी आघाडीचा उमेदवार म्हणून नकार दिल्यानंतर आता महात्मा गांधीजींचे नातू तसेच पश्‍चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांनीही आपला नकार कळवला आहे.
सुरुवातीला उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव समोर आले होते. कम्युनिस्ट पक्षाचे येचुरी यांनी नवोदितांना संधी द्यायला हवी, असे मत व्यक्‍त केले होते. पवार यांनी पुढे स्वत:च उमेदवारीस नकार दिला. नंतर तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार निवडीसाठी दिल्लीत झालेल्या विरोधी आघाडीच्या बैठकीत गोपाळकृष्ण गांधींचे नाव समोर आले होते. आघाडीने गांधी यांना उमेदवारीची ऑफर दिली होती. तथापि, गांधी यांनीही नकार दिला असून, विरोधी आघाडीसाठी हा एक मोठा धक्‍का मानला जात आहे.
विरोधी आघाडीकडून याआधी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नावही पुढे करण्यात आले होते. येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होणार असून, सत्ताधारी आघाडीनेही अद्याप आपल्या उमेदवाराचे नाव घोषित केलेले नाही. चालू आठवड्यात सत्ताधार्‍यांसह विरोधी आघाडीलाही आपापल्या उमेदवारांचे नाव घ

राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार म्हणून माझ्या नावाचा विचार करण्यात आला, याबद्दल विरोधी पक्षांचा मी आभारी आहे. मात्र, काही कारणांमुळे मी ही निवडणूक लढवू शकत नाही.
– गोपाळकृष्ण गांधी

Back to top button