शेतकर्‍यांना एकरी 100 टन ऊस उत्पादनाचे धडे

शेतकर्‍यांना एकरी 100 टन ऊस उत्पादनाचे धडे
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा: 'व्हीएसआय'च्या माजी शास्त्रज्ञांनी बारामतीच्या शेतकर्‍यांना एकरी 100 टन ऊस उत्पादनाचे धडे दिले. बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ आणि सहायक निबंधक, सहकारी संस्था, नेचर केअर फर्टिलायझर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस लागवड तंत्रज्ञान कार्यशाळा पार पडली.

कार्यशाळेसाठी सोमेश्वर, वाणेवाडी, लाटे, वडगाव, खांडज, भवानीनगर, डोर्लेवाडी येथे आडसाली लागवडीच्या तंत्रज्ञानासाठी व मृदसंवर्धनासाठी व्हीएसआयचे माजी शास्त्रज्ञ सुरेश माने यांनी शेतकर्‍यांना माहिती दिली. त्यामध्ये एकरी 100 टन ऊस उत्पादनाचा कानमंत्र गावातील शेतकर्‍यांना बांधावर जाऊन देण्यात आला. त्याचबरोबर जमीन सुधारणा व मृदसंवर्धन संगोपनाबाबत जैविक सेंद्रिय खतांचे महत्त्व सांगण्यात आले.

या उपक्रमामुळे पिकांची उत्पादनक्षमता वाढवून शेतकरी व ऊस उत्पादक यांना अधिक उत्पादन घेण्यास प्रोत्साहन मिळेल. तसेच ऊस उत्पादन वाढणार आहे. या उपक्रमास शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. हा उपक्रम पुढील वर्षभर राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शिवारफेरीचे नियोजनही करण्यात आले आहे. या माध्यमातून ऊसपिकाचे शाश्वत उत्पादन पुस्तिकेचे वाटप करण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत शेतकर्‍यांना बेणे निवड, पूर्वमशागत, लागल, बेसल डोस, अंतर मशागत, आंतरपीक, उसावरील फवारण्या, ड्रिपमधील खते, तणांचे नियंत्रण अशा विविध बाबींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकर्‍यांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जवळच्या खरेदी-विक्री संघाच्या शाखेमध्ये आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन खरेदी-विक्री संघातर्फे अध्यक्ष शिवाजीराव
टेंगले व व्यवस्थापक नीलेश लोणकर यांनी केले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news