लोणी-धामणी परिसरात कडक ऊन | पुढारी

लोणी-धामणी परिसरात कडक ऊन

लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा
लोणी-धामणी (ता. आंबेगाव) परिसरात सध्या दिवसभर कडकडीत ऊन पडत आहे. त्यामुळे पावसाळा की उन्हाळा सुरू आहे, हे कोडेच आहे. सध्या पाऊस येण्याची चिन्हे दिसत नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. शेतकरी आभाळाकडे टक लावून पाहत आहे. पावसाने ओढ दिल्याने खरिपातील पेरण्या लांबल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची कामे जवळजवळ उरकून घेतली आहेत. परंतु, पावसाने ओढ दिल्याने खरिपातील पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. परिसरातील विहिरीतील पाणी तळाला गेल्याने शेतामध्ये असलेली पिके जळून चालल्याने शेतकऱ्यांचा जीव कासावीस होत आहे. पावसाने जर लवकर हजेरी लावली नाही, तर जनावरांच्या व माणसांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

हेही वाचा

इंदापुरातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

पिंपरी: पालखी मार्गावरील हातगाडी, स्टॉल दोन दिवस बंद ठेवणार

20 भारतीय मच्छीमारांची पाकिस्तानकडून सुटका

Back to top button