पीडितांना जलद न्यायासाठी प्रयत्न : श्रीमती एस. आर. तिवारी | पुढारी

पीडितांना जलद न्यायासाठी प्रयत्न : श्रीमती एस. आर. तिवारी

सांगली पुढारी वृत्तसेवा: कौटुंबिक न्यायालयातील प्रलंबित दाव्यामध्ये कायद्याच्या चौकटीतून जास्तीत- जास्त कुटुंबांना विभक्त होण्यापासून व त्यांच्या मुलांना पोरके होण्यापासून वाचविण्याचा प्रयत्न करू. पीडितांना जलद न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही कौटुंबिक न्यायालयाचे नवनियुक्त न्यायाधीश श्रीमती एस. आर. तिवारी यांनी दिली.

सांगली वकील संघटनेच्या वतीने नवनियुक्त न्यायाधीश तिवारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा न्यायाधीश पी. बी. जाधव, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती एस. आर. तिवारी, न्यायाधीश एम. एम. चितळे, न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील, न्यायाधीश डब्ल्यू. ए. सय्यद यांचा सत्कार झाला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर प्रमुख पाहुण होते. जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.

वकील संघटनेचे अध्यक्ष प्रशांत नारायणराव जाधव यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष विश्वजित नरवाडे यांनी आभार मानले. सेक्रेटरी अर्चना उबाळे, प्रविना हेटकाळे, शशिकला पाटील, शिवाजी कांबळे यांच्याहस्ते नवनियुक्त न्यायाधीशांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजंदेकर म्हणाले, पीडित व्यक्तिना लवकरात लवकर न्याय देण्यासाठी सर्व न्यायाधीश व वकिलांनी प्रयत्न केले पाहिजेत. सहसेक्रेटरी आनंद जाधव व अस्मिता कवठेकर , सदस्य शितल मद्वाण्णा, सनी साळुंखे, किरण सादरे, संतोष कटीमनी, कविता देशपांडे, स्वाती गौड, सुप्रिया कांबळे उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button