खाद्यतेलांच्या दरांना घाऊक बाजारात उतार | पुढारी

खाद्यतेलांच्या दरांना घाऊक बाजारात उतार

पुणे : पुढारी वृत्तसेवा: इंडोनेशियाने पामतेलाच्या निर्यातीवरील हटविलेले निर्बंध, युक्रेनसह युरोपीय देशांमधून सूर्यफूल बियांसह तेलाची सुरू झालेली निर्यात, यामुळे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात खाद्यतेलांचे दर 15 किलोमागे 50 ते 60 रुपयांनी उतरले आहेत. घाऊक बाजारात दर उतरले असले, तरी किरकोळ बाजारात दर खाली येण्यास दहा दिवस लागणार आहेत.

काही काळापासून इंधनासोबतच खाद्यतेलांच्या किमतीत सातत्याने वाढ सुरू होती. एक लिटर खाद्यतेलाचे दर 200 रुपयांपेक्षाही जास्त झाले होते. मात्र, जागतिक स्तरावर विविध घडामोडींमुळे खाद्यतेलांच्या दरात 15 किलो/लिटरमागे 50 ते 60 रुपयांनी घट झाली आहे. इंडोनेशिया सरकारने पामतेलावर घातलेले निर्बंध हटविले आहेत. येथील सरकारकडून तेलाचा साठा खाली करण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून पामतेलावरील निर्बंधांमुळे मलेशिया व थायलंड येथून पामतेलाची आयात करण्यात येत होती.

राज्यात सरासरीपेक्षा जादा पाऊस

परंतु, आता निर्बंध हटविल्याने आवकेत मोठी वाढ झाली आहे. याखेरीज, रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर देशात फक्त रशिया व अर्जेंटिना येथून सूर्यफूल तेलाची आवक होत होती. मात्र, आता युक्रेन तसेच युरोपातील देशांनी सूर्यफुलाच्या बिया तसेच तेलाची निर्यात सुरू केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सूर्यफूल व पामतेल मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने खाद्यतेलांच्या दरात घट झाल्याचे खाद्यतेलाचे व्यापारी कन्हैयालाल गुजराथी यांनी सांगितले.

खाद्यतेल दरात झालेली घट (प्रतिकिलो)
पामतेल, सोयाबीन,
सरकी – 4 ते 5 रुपये
सूर्यफूल – 3 रुपये
वनस्पती तूप – 2 रुपये
शेंगदाणा, खोबरे – नाही

घाऊक बाजारात 15 किलो/ लिटरचे दर पुढीलप्रमाणे
खाद्यतेल दर
पामतेल 2100 ते 2350
सोयाबीन 2200 ते 2450
सरकी 2300 ते 2700
सूर्यफूल 2580 ते 2710
शेंगदाणा 2650 ते 2700
खोबरेल 2450 ते 2500
वनस्पती तूप 2200 ते 2700

हेही वाचा

युरियाच्या औद्योगिक वापरात दोषींवर गुन्हे; केंद्राच्या आदेशान्वये कृषी विभागाकडून तपासणी सुरू

गिरगावतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 23 जणांना अटक

‘आरटीई’च्या दुसर्‍या यादीत 1,849 विद्यार्थ्यांची निवड

Back to top button