

पुणे, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला ऊसतोड कामगार पुरविण्याचा करार करून मजूर न पुरवता साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ठेकेदार गोकूळ जब्बू राठोड (रा. कोरेगाव, जि. औरंगाबाद) याच्यावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रवीण दिलीप गायकवाड (वय 33) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार जुलै 2021 ते जून 2022 या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी कारखान्याला ऊसतोड मजूर पुरविण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे. त्यांनी कामगार पुरविण्याबाबत गोकुळ राठोड याच्याशी बोलणी केली होती.
त्याने 8 जोडी ऊसतोड कामगार देतो, अशी बतावणी तक्रारदार प्रवीण गायकवाड यांच्याकडे केली. त्याबदल्यात त्यांच्याकडून 7 लाख 50 हजार रुपये घेतले. परंतु त्यांना कामगार न पुरविता त्यांची फसवणूक केली. तक्रारदारांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
हेही वाचा