13 वर्षांनंतर त्यांनी दहावीत मिळवले यश; रात्र शाळेत अभ्यास करून मिळाले 86 टक्के गुण | पुढारी

13 वर्षांनंतर त्यांनी दहावीत मिळवले यश; रात्र शाळेत अभ्यास करून मिळाले 86 टक्के गुण

पुणे : संसाराचा गाडा चालविता-चालविता रात्रशाळेत शिक्षण घेऊन सुजाता चव्हाण यांनी तब्बल 13 वर्षांनी 10 वीची परीक्षा दिली. त्यातूनही त्यांनी 86.80 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. सुजाता जनता वसाहत येथे राहतात. पती, दोन मुले असा त्यांचा परिवार. माहेरची परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे 13 वर्षांपूर्वी त्यांची 10 मध्येच शाळा सुटली अन लग्न झाले.

लग्नानंतरही त्यांची शिकण्याची इच्छा खूप होती. घरातून पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांना खूप झगडावे लागले. अखेर त्यांनी कुटूंबियांचा पाठिंबा मिळविला आणि 10 वी ची परीक्षा दिली. त्यात त्यांना 86 टक्के गुण मिळाले आहेत. आबासाहेब अत्रे शाळेत त्यांनी रात्रीचे शिक्षण घेऊन दहावीचा अभ्यास पूर्ण केला. आता त्या कॉमर्स शाखेतून पुढील शिक्षण पूर्ण करणार आहेत.

लहान मुलांना शिकविण्याची आवड असल्यामुळे, भविष्यात मुलांना शिकविण्याची संधी मिळाली तर नक्कीच त्या संधीचा लाभ घेणार असल्याचे त्यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

मी सध्या एका एनजीओमध्ये काम करते. शिक्षणाची खूप आवड होती. मात्र, परिस्थितीमुळे शिकता आले नाही. आता कुटुंबीयांच्या पाठिंब्याने 10 वी ची परीक्षा दिली. घरचे काम करून शिक्षण घेणे जिकिरीचे काम आहे. कधी-कधी चिडचिड, वाद होतात. मात्र, घरातील सर्वजण सांभाळून घेतात.

                – सुजाता चव्हाण, विद्यार्थिनी, आबासाहेब अत्रे रात्रशाळा

हेही वाचा

.. तर मग भुजबळ, वडेट्टीवार ओबीसींसाठी करतात तरी काय? : देवयानी फरांदेंची टीका

सर्वात वेगाने वाढत असलेले कृष्णविवर

पृथ्वीसारख्या दोन ग्रहांचा शोध

Back to top button