कृषिपंपांची चोरी करणारे जेरबंद | पुढारी

कृषिपंपांची चोरी करणारे जेरबंद

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शेतकर्‍यांच्या कृषिपंपांची चोरी करणार्‍या दोघांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले असून, चोरलेले 9 शेतीपंप जप्त करण्यात आले आहेत. आकाश सुभाष जगताप (23), हर्षद केतन जगताप (22, रा. दोघे. न्हावी सांडस) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये शेतीपंपाव्दारे शेतीला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांत भीमा नदीच्या काठावर वसलेल्या पिंपरी, न्हवी सांडस तसेच खंडोबा माळ या गावांमधून पंपचोरीच्या घटना घडल्या होत्या. याबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. शेतकर्‍यांना लोणीकंद पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रारीदेखील केल्या होत्या.

‘अग्‍निपथ’ला विरोध होत असताना अग्निवीरांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

पंपचोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पोलिस ठाण्याचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान न्हावी सांडस या गावातील दोघांनी पंप चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांच्या पथकाने आकाश आणि हर्षद या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी परिसरातील गावांमधून शेतीपंप चोरल्याची कबूली दिली.

पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख 70 हजार रुपये किमतीचे 9 शेतीपंप जप्त केले आहेत. आकाश आणि हर्षद जगताप हे न्हावी सांडस या गावातील असून, शेती काम करतात, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा

पिंपरी : दरोडा टाकण्याचा डाव उधळला, पाचजणांना घेतलं ताब्यात

Rajinikanth : रजनीकांत मोठा धमाका करणार, Jailer चित्रपटाचे पोस्टर रिलीज

रत्नागिरी : त्यांनी पुसला ‘नॉन मॅट्रिक’चा शिक्का

Back to top button