जेवण मागितले म्हणून एसटीच्या वाहक-चालकाला मारहाण; पुणे-नाशिक महामार्गावरील अधिकृत थांब्यावरील प्रकार | पुढारी

जेवण मागितले म्हणून एसटीच्या वाहक-चालकाला मारहाण; पुणे-नाशिक महामार्गावरील अधिकृत थांब्यावरील प्रकार

आळेफाटा : पुणे-नाशिक महामार्गावर एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी निश्‍चित केलेल्या हॉटेलमध्ये एसटीच्या वाहक- चालकाला जेवण मागितले म्हणून वेटरने मारहाण केली. ही घटना आळेफाटा (ता. जुन्नर) नजीक शुक्रवारी १७ रोजी १२ वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे प्रवाश्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसर पुणे-शिवाजीनगर येथून शुक्रवारी नेहमीप्रमाणे शिवाजीनगर ते नाशिक जव्हार बस मार्गस्त झाली. पुणे -नाशिक महामार्गावर आळेफाटा नजीक एसटीमंडळाने प्रवाशांसाठी निश्‍चित केलेल्या अधिकृत हॉटेलवर बाराच्या सुमारास नेहमी प्रमाणे बस थांबली. बसमध्ये ३५ प्रवाशी प्रवास करत होते. प्रवाशी नष्टा, जेवण करत असताना एसटीच्या वाहक-चालकाने जेवणाची ऑर्डर दिली. मात्र १५ मिनिट होऊनही जेवण आले नाही, याचा जाब सबंधित वाहक चालकाने वेटरला विचारला.

माजी नगरसेविकेची अधिकार्‍यास शिवीगाळ; हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार

मात्र व्यवस्थापकाने जेवण देत नाही, काय करायचे कर असे म्हणताच वेटरने वाहक- चालकाच्या अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या प्रमाणात प्रवाशी जमा झाले. त्यांनी वाद सोडवण्याच्या प्रयत्न केला; मात्र व्यवस्थापकासह वेटर ऐकण्याच्या मनस्थित नव्हते. त्यानंतर वाहक-चालकाला हॉटेलमधून हाकलून देण्यात आले. नंतर पोलिसांना बोलावण्यात आले. मात्र झालेल्या वादामुळे प्रवाश्यांना दोन तास बसमध्ये बसून राहावे लागले.

धायरीत बांधकामांवर हातोडा; चार इमारती जमीनदोस्त

याबाबत वाहक-चालकाने सांगितले की, आम्हाला या हॉटेलवर थांबणे बंधनकारक आहे. येथे थांबल्याची पावती आमच्या डेपोत नाही दाखवली तर आमच्याकडून दंड वसूल केला जातो. मात्र या घटनेने प्रवाशांसाठी निश्‍चित केलेल्या हॉटेल चालकांची मुजोरी वाढली असून एसटीचे वाहक-चालकच सुरक्षित नाही, असे म्हणावे लागेल.

Back to top button