धायरीत बांधकामांवर हातोडा; चार इमारती जमीनदोस्त | पुढारी

धायरीत बांधकामांवर हातोडा; चार इमारती जमीनदोस्त

धायरी, पुढारी वृत्तसेवा: सिंहगडरोड परिसरातील धायरी रायकर मळा, सर्व्हे न. 76 येथील अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. या परिसरात प्रथमच जॉ. कटरच्या साहाय्याने सहामजली चार इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. या वेळी नागरिकांनी व संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी तीव्र विरोध केला, परंतु या विरोधाला न जुमानता ही कारवाई केली.

पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग झोन क्र.2 यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्या नियंत्रणाखाली व कार्यकारी अभियंता राहुल साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता राहुल तिखे, इमारत निरीक्षक संदेश पाटील, कनिष्ठ अभियंता धनंजय खोले, निशिकांत चाफेकर या पथकाने ही कारवाई केली.

माजी नगरसेविकेची अधिकार्‍यास शिवीगाळ; हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार

या वेळी एक जॉ कटर मशीन, एक जेसीबी व पंधरा कर्मचारी इत्यादींच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. या वेळी सिंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे व पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतिभा तांदळे, पोलिस उपनिरीक्षक किशोर तनपुरे व वीस पोलिस कर्मचार्‍यांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

नागरिकांनी कोणतीही अनधिकृत बांधकामे करू नयेत. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. हा विकास आराखडा तयार करत असताना अनधिकृत बांधकामांमुळे अडथळा येत आहे.

           – राहुल साळुंखे, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग

हेही वाचा

Sonia Gandhi : सोनिया गांधींना श्‍वासोच्छवासाचा त्रास, दिल्लीत उपचार सुरु

नाशिक सिडको : विद्यार्थ्यांनी लष्कराकडे करियर म्हणून पहावे : नवनियुक्त लेफ्टनंट घंगाळे 

पुणे: बावडा दूरक्षेत्र हद्दीत अवैध धंद्यांवर छापे; सात जणांवर गुन्हा दाखल

Back to top button