ऐतिहासिक बुरूज मोजताहेत शेवटच्या घटका, जुन्नर येथील चिंताजनक स्थिती; जीवितहानीची दाट शक्यता | पुढारी

ऐतिहासिक बुरूज मोजताहेत शेवटच्या घटका, जुन्नर येथील चिंताजनक स्थिती; जीवितहानीची दाट शक्यता

संजय थोरवे

नारायणगाव : तालुक्याचे महत्त्वाचे कार्यालय असणारे तहसील, पोलिस ठाणे, न्यायालय या ठिकाणी जाण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचे ऐतिहासिक बुरूज हे शेवटच्या घटका मोजत असून, कोणत्याही क्षणी पडून जीवितहानी होण्याचा धोका वाढला आहे. जुन्नर तालुक्याला पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाला असून, केवळ शासकीय उदासीनतेमुळे ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन होत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

जुन्नर हे तालुक्याचे ठिकाण असून, या ठिकाणी एका ऐतिहासिक वाड्याच्या आत पोलिस ठाणे, तहसील, न्यायालय, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालय, अशी तालुक्यातील न घातल्याने या वाड्याच्या तटबंद्या संपूर्ण ढासळलेल्या असून, मुख्य प्रवेशद्वारावरील बुरूज हे बर्‍यापैकी ढासळले आहेत. त्यावर छोटी-मोठी झुडपे वाढलेली आहेत. आजमितीला पावसाचे दिवस चालू असून, जोराचा पाऊस झाल्यास हे बुरूज कोणत्याही क्षणी ढासळण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, याच बुरूजाच्या आतील बाजूस कोर्ट कामकाजाचे लिखाण करणारे खासगी कारकून तसेच पुस्तक विक्रेते तर बाहेरील बाजूस दस्तऐवज लिहिणारे कारकून, मुद्रांक विक्रेते आहेत. त्यामुळे हा बुरूज ढासळला तर जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागातही ‘प्री-वेडिंग शूट’; पाश्चिमात्यांचे अंधानुकरण न करण्याचा विचारवंतांचा आग्रह

नेते, अधिकारी यांचे दुर्लक्ष कारणीभूत

जुन्नर तालुक्याला पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाला आहे. मात्र, तालुक्यातील अनेक ऐतिहासिक वास्तू संवर्धन होण्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील महत्त्वाची कार्यालये ज्या वाड्यात आहेत, तो वाडा व बुरूज यांची ऐतिहासिक पद्धतीनेच पुन्हा बांधणी केली, तर तालुक्यात येणार्‍या पर्यटकांसाठी आकर्षण बिंदू ठरणार आहे. मात्र, शासकीय उदासीनता, नेतेमंडळी व अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे ऐतिहासिक साक्ष देणारे वाडे, लेण्या, तर काही किल्ल्यांवर ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

Back to top button