आयुष्यात मोठे होण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे; दीपक पायगुडे यांचे मत | पुढारी

आयुष्यात मोठे होण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे; दीपक पायगुडे यांचे मत

पुणे, पुढारी वृत्तसेवा: ‘कोणताही माणूस आयुष्यात मोठा होण्यासाठी पैसा नव्हे, तर त्याने घेतलेले शिक्षण महत्त्वाचे आहे,’ असे मत लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी व्यक्त केले. गुरुवार पेठेतील प्रभात जन प्रतिष्ठान व सेवा सहयोग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार पेठेतील श्री नाकोडा भैरव जैन धर्मशाळा येथे आयोजित कार्यक्रमात शहराच्या पूर्व भागातील 100 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत देण्यात आली.

यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सेवा सहयोगचे इंद्रजित देशमुख, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, कृष्णा परदेशी, दत्ता काळे, मंगेश शिंदे, मनोज शेलार, ओंकार निंबाळकर, अक्षय चौहान, कुणाल जगताप आदी उपस्थित होते. पायगुडे म्हणाले, ‘मन, मनगट आणि मेंदू बळकट असेल, तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. समाजात समर्पण वृत्तीने काम करणार्‍या मंडळींची संख्या कमी झाली आहे.

आजमितीस शिक्षणाचे महत्त्व पटवून देत समाजाच्या तळागाळात शिक्षण पोहोचविणे गरजेचे आहे. शिक्षणाने मुलांंमध्ये जिद्द व आत्मविश्वास निर्माण होईल.’ यावेळी महेश सूर्यवंशी, किशोर चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. मंगेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कृष्णा परदेशी, नीलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, गुन्हा दाखल

ग्रामीण भागातही ‘प्री-वेडिंग शूट’; पाश्चिमात्यांचे अंधानुकरण न करण्याचा विचारवंतांचा आग्रह

नोकरीसाठी सादर केले दहावीचे बनावट प्रमाणपत्र; तरुणावर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा

Back to top button