टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, गुन्हा दाखल | पुढारी

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, गुन्हा दाखल

पिंपरी : भरधाव टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 18 मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आळंदी रोड, दिघी येथे घडली. शुभम प्रकाश पाटील (26), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश सुहास पाटील (62, रा. नवजीवन पार्क, ठाकोरजीनगर, गुजरात) यांनी बुधवारी (दि. 15) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे: सहायक पोलिस निरीक्षकास लाच घेताना पकडले; रांजणगाव पोलिस ठाण्यातील घटना

त्यानुसार, अज्ञात टेम्पोचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा शुभम हा आकाश पाटील याच्यासोबत दुचाकीवरून दिघी रस्त्याने जात होता. दरम्यान, भरधाव आलेल्या टेम्पोने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शुभम पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Back to top button