पैसे परत न केल्याने व्यावसायिकाची आत्महत्या | पुढारी

पैसे परत न केल्याने व्यावसायिकाची आत्महत्या

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: जीएसटी आणि सोन्याचा व्यवसाय करण्यासाठी दिलेले 32 लाख परत न करता धमकी दिल्याने एका व्यावसायिकाने आत्महत्या केली. व्यावसायिकास धमकी देण्याचा प्रकार 2016 पासून 28 मे 2022 या कालावधीत घडला.
दत्तात्रय फरताडे (45) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

याप्रकरणी त्यांच्या पत्नीने बुधवारी (दि.15) चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, नाना सोलनकर, विलास कोपरटकर, उमेश पाटील, लालू मुलाणी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती दत्तात्रय फरताडे यांनी बिग बास्केट, पिसोळी, मुंढवा, हिंजवडी, उबाळेनगर यांच्याकडून वेंडरशिप घेतली; तसेच आरोपी नाना सोलनकर आणि विलास कोपरटकर यांना सुपरवायझर म्हणून कामाला ठेवले.

वेंगुर्ले : कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्कची कारवाई संशयास्पद

दरम्यान, दत्तात्रय यांनी त्यांच्याकडे जीएसटी भरण्यासाठी 19 लाख 50 हजार रुपये दिले; मात्र सोलनकर आणि कोपरटकर यांनी जीएसटीचा भरणा केला नाही. दत्तात्रय फरताडे यांनी जीएसठी भरण्यासाठी दिलेले पैसे सोलनकर आणि कोपरटकर यांनी स्वत: खर्च केले. ते पैसे फरताडे यांनी परत मागितल्यानंतर त्या दोघांनी टाळाटाळ केली. तसेच फडतारे यांना धमकी दिली.

पिंपरी : दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

आरोपी उमेश पाटील आणि लालू मुलाणी यांनी मुंबई येथे सोन्याचा व्यवसाय करण्यासाठी दत्तात्रय फरताडे यांच्याकडून 40 लाख रुपये रोख स्वरुपात घेतले. त्यातील आठ लाख रुपये परत करून राहिलेले 32 लाख रुपये परत केले नाहीत. तसेच, पैसे परत मागितल्याने धमकी दिली. अशा प्रकारे आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीकडून पैसे घेऊन त्यांना मानसिक त्रास दिला. शेवटी या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या पतीने आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक नवनाथ कुदळे तपास करीत आहेत.

Back to top button