स्वच्छतागृहांची स्वच्छता आता खासगी संस्थेकडे | पुढारी

स्वच्छतागृहांची स्वच्छता आता खासगी संस्थेकडे

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या स्वच्छतागृहांची स्वच्छता खासगी संस्थेच्या माध्यमातून करून घेण्यात येणार आहे. यासाठी पाच झोनसाठी प्रत्येकी एक, अशा पाच संस्थांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये जवळपास 1200 स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे.

यामध्ये सार्वजनिक युरीनल आणि सार्वजनिक शौचालयांचाही समावेश आहे. या सर्व स्वच्छतागृहांची दररोज दोन वेळा स्वच्छता करण्याची जबाबदारी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांची आहे. मात्र, कर्मचार्‍यांकडून या स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जात नसल्याच्या आणि त्यामुळे दुर्गंधी सुटत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

या पार्श्वभूमीवर शहरातील महापालिकेच्या सर्व स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यासाठी निविदा काढून खासगी संस्थांची नेमणूक केली जाणार आहे. पाच झोनसाठी वेगवेगळ्या पाच निविदा काढण्यात येणार आहेत. यासाठी वर्षाला 4 कोटी रुपये साफसफाईसाठी, तर 5 कोटी रुपये दुरुस्तीसाठी येणार असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.

आयुक्त असेही म्हणाले,

  •  विविध 647 कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यातील 500 कामांच्या निविदा मागविण्यात आल्या असून, 400 निविदा उघडण्यात आल्या आहेत.
  • सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन नालेसफाई व पावसाळी कामे सात दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.
  • चेंबरच्या स्वच्छतेसाठी लवकरच आणखी दोन अद्ययावत मशिन घेणार.

हेही वाचा

भाजप शहराध्यक्ष बदलाबाबत चर्चा

Video : नाशिक-सातपूर औद्योगिक वसाहतीत मध्यरात्री बिबट्याचे दर्शन

भाजपने केला वारकर्‍यांचा अपमान : सुनील शेळके

Back to top button