‘एमपीएससी’कडून कमाल संधींची मर्यादा रद्द | पुढारी

‘एमपीएससी’कडून कमाल संधींची मर्यादा रद्द

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पद भरती परीक्षांची तयारी करणार्‍या उमेदवारांच्या कमाल संधींबाबत फेरबदल केला आहे. निर्धारित वयोमर्यादेत आता कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे. उमेदवारांच्या कमाल संधींची मर्यादा रद्द करण्याचा निर्णय ‘एमपीएससी’ने घेतला आहे.

आता पूर्वीप्रमाणेच उमेदवारांना प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे संधीमुळे परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आता स्पर्धा परीक्षार्थींवर येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘एमपीएससी’ने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर खुल्या गटातील उमेदवारांना कमाल सहा संधी,

उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल नऊ संधी 2020 मध्ये निश्चित केल्या, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. या निर्णयाच्या अनुषंगाने संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. मात्र, आता या निर्णयात फेरबदल केला आहे.

हेही वाचा

सांगली : अनैतिक संबंधातून वाघवाडीत महिलेचा गळा आवळून खून

सातारा : नवीन शैक्षणिक वर्षात पुन्हा सेतू अभ्यासक्रम

सातारा : सहापदरीकरणाचे काम दिवाळीनंतरच

Back to top button