पुणे : शेतकर्‍याच्या घरी चोरट्यांचा डल्ला; ४ लाखांचे दागिने लंपास | पुढारी

पुणे : शेतकर्‍याच्या घरी चोरट्यांचा डल्ला; ४ लाखांचे दागिने लंपास

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : घराला कडी घालुन जनावरांना चारा आणण्यासाठी जवळच्या शेतात गेल्यावर शेतकर्‍याच्या बंद घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील 4 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना रविवारी (दि. 12) भर दुपारी घडली आहे. काबाडकष्ट करून पै-पै जमवणार्‍या शेतकरी परिवारात अशी चोरी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बेराेजगारांसाठी खूशखबर : पुढील दीड वर्षांमध्‍ये १० लाख जणांना नाेकरी मिळणार ! पंतप्रधान मोदींनी दिले भरतीचे आदेश

काळूराम शांताराम बोंबले (वय 42, रा. वेताळे, ता. खेड) असे चोरी झालेल्या घरमालक शेतकर्‍याचे नाव आहे. खेड पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात त्यांनी तक्रार नोंदवली आहे. जवळच असलेल्या शेतात जाऊन लगेच परतायचे असल्याने घराला फक्त कडी घालून काळूराम बोंबले, त्यांची पत्नी व तीनही मुले वैरण आणायला गेले. काही वेळात परत आल्यावर घरातील साहित्य विखुरलेल्या अवस्थेत पाहून त्यांनी दागिने ठेवलेल्या लोखंडी कपाटाची चाचपणी केली, तेव्हा घरातुन अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे 3 लाख 99 हजार 700 रुपयांचे दागिने लांबविल्याचे लक्षात आले.

मविआ-भाजपमध्ये सामना, विधान परिषदेचीही लढत चुरशीची; १० जागांसाठी ११ उमेदवार

चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये दीड महिन्यापूर्वी खरेदी केलेली साडेतीन तोळे वजनाची 1 लाख 99 हजार 700 रुपये किमतीची सोन्याची चेन, 4 तोळे वजनाचे व 1 लाख 80 हजार रुपयांचे मंगळसूत्र व अर्धा तोळे वजनाचे 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे नेकलेस असा एकूण 3 लाख 99 हजार 700 रुपयांच्या ऐवजाचा समावेश आहे. सहायक पोलिस निरीक्षक राहुल लाड या घटनेचा तपास करीत आहेत.

Back to top button