पुणे : चारशे वर्षांपूर्वीचा ‘सैराट फेम’ इनामदार बंधूंचा वाडा पाण्याबाहेर | पुढारी

पुणे : चारशे वर्षांपूर्वीचा ‘सैराट फेम’ इनामदार बंधूंचा वाडा पाण्याबाहेर

कालठण : पुढारी वृत्तसेवा : उजनी धरण वजा पातळीत गेल्याने धरणाच्या पाण्यात लुप्त झालेला इनामदार बंधूंचा भव्यदिव्य वाडा दिसू लागला आहे. इनामदार बंधूंचा हा आकर्षक वाडा इतिहास व निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच ठरला आहे. ‘सैराट’ चित्रपटाचे चित्रीकरण येथे झाल्यानंतर हा वाडा आणखीनच प्रकाशझोतात आला.

बेराेजगारांसाठी खूशखबर : पुढील दीड वर्षांमध्‍ये १० लाख जणांना नाेकरी मिळणार ! पंतप्रधान मोदींनी दिले भरतीचे आदेश

उजनी धरण पाणक्षेत्रामुळे परिसरातील गतवैभव असलेल्या वास्तू लुप्त झाल्या आहेत. मात्र, विस्ताराने मोठ्या असलेल्या उजनी धरणाची पाणीपातळी कमी होताच पुरातन मंदिरे, वाडे बाहेर पडू लागतात. देवराव, जिजाबा, नागोबा, इनामदार बंधूंनी सुमारे चारशे वर्षांपूर्वी भीमा नदीतीरावर बांधलेला भव्यदिव्य वाडा उजनी धरण क्षेत्रातील कुगाव येथे आहे.

मविआ-भाजपमध्ये सामना, विधान परिषदेचीही लढत चुरशीची; १० जागांसाठी ११ उमेदवार

उजनी धरण पाणलोट क्षेत्रात असलेल्या या वाड्याची सध्या मोठ्या प्रमाणात पडझड झाली असली, तरी मुख्य दरवाजा, एक बुरूज, वाड्याच्या आतील विहिरी, मजबूत दगडी तटबंदी आदींसह प्रवेशद्वाराजवळच्या कमानींचा भाग पाहता येतो. या वाड्याची दगडी रचना अतिशय सुंदर व आकर्षक आहे. उजनी धरण वजा पातळीत येताच, हा वाडा पाण्याबाहेर पडतो व धरण भरल्यानंतर इनामदार बंधूंचा हा वाडा पूर्णपणे पाण्याखाली जातो.

 

Back to top button