धारूर (बीड) ; अतुल शिनगारे: धारूर नगरपरिषद निवडणुकीत दहा प्रभागाचे वीस जागांचे आरक्षण आज सोमवारी (दि. १३ जुन) रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमूख याच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. यामुळे धारूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचे बिगूल लवकरच वाजणार असल्याचे स्पष्ट झाले.
आरक्षण सोडतीचे पीठासन अधिकारी म्हणून ओंकार देशमूख यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. शालेय विद्यार्थिनी बांगर हिच्या हस्ते चिठ्ठ्या टाकून आरक्षण काढण्यात आले. यामध्ये सर्व प्रभाग १० मधील 'अ' जागेसाठी महिला असणार आहेत. तर प्रभाग क्रमांक दोन व दहा यामधील महिला या अनुसूचित जाती प्रवर्गातील असणार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक ९ मधील 'ब' अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव राहिलेला आहे.
१० प्रभागातील वीस जागांचे आरक्षण प्रभाग क्रमांक १ अ) खुला प्रवर्ग महिला ब) सर्वसाधारण खुला प्रवर्ग,,प्रभाग क्रमांक २ अ) अनुसूचित जाती महिला एससी (ब) सर्वसाधारण खुला, प्रभाग क्रमांक 3 अ) खुला प्रवर्ग महिला (ब) सर्वसाधारण खुला, प्रभाग ४ अ) खुला प्रवर्ग महिला ब) सर्वसाधारण खुला, प्रभाग क्रमांक ५ अ) खुला प्रवर्ग महिला (ब) सर्वसाधारण खुला, प्रभाग क्रमांक ६ अ) खुला प्रवर्ग महिला ब ) सर्वसाधारण खुला, प्रभाग ७ अ) खुला प्रवर्ग महिला ब) सर्वसाधारण खुला, प्रभाग क्रमांक ८ अ) खुला प्रवर्ग महिला (ब) सर्वसाधारण खुला,
प्रभाग क्रमांक ९ अ) खुला प्रवर्ग महिला ब) अनुसूचित जाती प्रवर्ग, प्रभाग क्रमांक १० अ) अनुसूचित जाती महिला प्रवर्ग, ब) सर्वसाधारण खुला अशाप्रकारे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.
आरक्षण हे चिठ्ठ्या टाकून लहान मुलींच्या हस्ते काढण्यात आले. यावेळी धारूर नगरपरिषदेचे कर्मचारी सचिन डावकर, माणिक लोखंडे, अरुण वाघमारे, शेख अब्बास, नागरगोजे, माणिक गायसामुद्रे, कराड, किरण नेहरकर यांनी काम पाहिले. तर यावेळी धारूर शहरातील आजी-माजी- भावी लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.
हेही वाचलंत का?