पुणेकरांचा गर्दीचा ‘सुपर संडे’; शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी झुंबड, प्राणिसंग्रहालयही फुलले | पुढारी

पुणेकरांचा गर्दीचा ‘सुपर संडे’; शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी झुंबड, प्राणिसंग्रहालयही फुलले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कोरोनामुळे दोन वर्षे बंद असलेल्या शहरातील शाळा बुधवारी (दि. 15) सुरू होत आहे. त्यामुळे पालक, मुलांमध्ये प्रचंड उत्साह आहे. शाळेची घंटा वाजण्यास केवळ दोन दिवस शिल्लक असल्याने रविवारी (दि. 12) गणवेशासह अन्य शालेय साहित्य खरेदीसाठी पुस्तकालय व कपड्यांच्या दुकानांत प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्यांचा शेवटचा रविवार असल्यामुळे राजीव गांधी प्राणिसंग्रहालय पर्यटकांनी फुलले होते. एकंदरीत रविवार शालेय साहित्य खरेदी आणि पर्यटनांसाठी ‘सुपर संडे’ ठरला.

शहरातील सर्वशाळा मंगळवारपासून सुरू होत असल्याने रविवारी विद्यार्थी, पालकांनी बाजारात गर्दी करून शैक्षणिक साहित्याची खरेदी केली. दगडूशेठ गणपती, अप्पा बळवंत चौक यासह उपनगरातील धनकवडी, कात्रज, धायरीसह ठिकठिकाणी दुकानाचा गर्दीचा महापूर दिवसभर होता. शाळा सुरू होण्यास अवघे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे आई-बाबांना घेऊन लहान मुले वह्या, पुस्तके, गणवेशासह रेनकोट, छत्री खरेदीसाठी बाहेर पडले होते.

त्यामुळे शहरातील सर्वच भागातील कपडे, पुस्तकांसह अन्य शालेय वस्तू विक्रीच्या दुकानात तुफान गर्दी झाली होती. मंडई, दगडूशेठ हलवाई मंदिर रस्ता, अप्पा बळवंत चौक तसेच उपनगरातील कात्रज, धनकवडी, आंबेगाव बु., धायरी, वडगाव बु., नांदेड या परिसरातील दुकानांत विद्यार्थी, पालकांची मोठी गर्दी झाली होती. रविवारी पाऊस नसल्याने दिवसभर बाजारातील गर्दी वाढत गेली. सकाळी 9 पासून गर्दीचा ओघ सुरू झाला तो रात्री उशिरापर्यंत पालक वर्ग वह्या, पुस्तकांसह विविध शालेय साहित्याची गर्दी करताना दिसले.

मुसेवाला हत्त्येप्रकरणी संतोष जाधव याला पुणे पोलिसांकडून अटक

रेनकोट, छत्रीचीही खरेदी

उन्हाळी सुटी संपल्यानंतर शाळा पुन्हा एकदा सुरू होत आहेत. दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्यामुळे काही शाळा सुरू झाल्या होत्या, त्यानंतर परीक्षा झाल्या. त्यानंतर दीड-दोन महिने उन्हाळी सुटी सुरू झाली होती. आता उन्हाळी सुटी संपल्यानंतर शाळा पुन्हा एकदा जोमाने सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांचे शालेय गणवेश, दप्तर, बूट, वह्या, पुस्तके खरेदीसाठी पालकांनी दुकानांमध्ये गर्दी केल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत होते. पावसाळा सुरू झाल्याने रेनकोट, छत्रीदेखील खरेदी करताना पालक-विद्यार्थ्यांचा ओढ होता.

पर्यटकांच्या गर्दीने प्राणिसंग्रहालय फुलले

बहुतांश पालक आपल्या मुलांना घेऊन रविवारी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात आले होते. त्यामुळे येथे नेहमीपेक्षा जास्तच गर्दी झाली होती. तिकीट खिडकीवर रांगा लागल्या होत्या. प्रवेशद्वारापासून मुख्य रस्त्यालगत असलेल्या पादचारी मार्गापर्यंत पर्यटकांची प्राणिसंग्रहालयात प्रवेश करण्यासाठी वेगळीच रांग लागली होती. प्रचंड गर्दी असल्यामुळे येथील वातावरणात एक वेगळाच उत्साह आणि कलकलाट ऐकू येत होता.

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात रविवारी झालेल्या गर्दीमुळे अधिकारी कर्मचार्‍यांच्या नाकीनऊ आले. ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते. येथील चारही तिकीट खिडक्यांवरील गर्दी रोखण्यासाठी कर्मचारी अपुरे पडत असल्यामुळे प्राणिसंग्रहालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांना स्वत: प्रवेशद्वारावर उभे राहून नियोजन करावे लागले.

खरीप तोंडावर असतानाही शर्यतीच्या बैलांना मागणी

सारसबागेतही सहकुटुंब

शहरातील अनेक पालक बच्चे कंपनीला घेऊन सारसबागे आले आहे. ऐरवीपेक्षा रविवारी या ठिकानी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. काहीजण सहकुटुंब फिरण्यासाठी आले होते. पुण्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ असलेला शनिवारवाडा सुध्दा गर्दीने फुलला होता. सकाळपासूनच येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन आले होते.

चौपाटीवर ‘फिरा रे’

पुणेकरांचे पर्यटनासाठी आवडीचे आणखी एक ठिकाण म्हणजे खडकवासला चौपाटी. रविवारी या चौपाटीवर सुध्दा मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या गर्दीमुळे येथील रस्त्यावर सुध्दा काही वेळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

हेही वाचा 

बदलत्या हवामानामुळे केसरचे उत्पादन घटले

कवठे येमाई येथे नेपाळी तरुणाची आत्महत्या

नाशिक : बसप्रवासात वृद्देकडील 12 तोळे सोने चोरीला

Back to top button